मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.
आम्ही (मी व माझी पत्नी) गेल्या सहा वर्षांपासून आमच्या घराच्या गच्चीवर एक छानसा माती विरहित जैविक बगीचा फुलवला असून वयपरत्वे ( माझे वय आता ७३ आहे) आम्हाला दोघांनाही आता बागेची देखभाल करणे दुरापास्त होऊ लागले आहे. त्यामुळेच आता आम्हाला आमच्या घराच्या गच्चीवरील बागेच्या देखभालीसाठी महिन्यातून दोनदा (शक्यतो रविवारी) दोन तास काम करून जाईल अशा अनुभवी माळ्याची नितांत गरज भासू लागली आहे. आम्ही फक्त झाडांना रोज पाणी घालत जाऊ.
कृपया मायबोलीकरांनी याबाबत मला मदत करावी अशी विनंती कतो.
मंडळी , बघता बघता जानेवारीचा शेवट आला. या वर्षीचा हिवाळाही अगदी हाडे गोठवणारा. मात्र बाहेरचे उणे -१० तापमान आणि स्नो काही कायम रहाणार नाहीये. लवकरच स्प्रिंग येइल. तेव्हा २०१४ च्या बागकामासाठी नवा धागा. तुमचे गार्डन प्लॅन्स, रोपं- बियाणे यासाठीचे खात्रीचे सोर्सेस, यावर्षी बागेत काही नवीन प्रयोग करुन बघणार असाल तर त्याबद्दल इथे जरूर लिहा. बागकामाची आवड असलेल्या सर्व नव्या-जुन्या मायबोलीकरांचे धाग्यावर स्वागत!
शोभेच्या रोपांना एखाद्या कलाकृतीचे रूप देण्याचे कौशल्य हाती असलेल्या मुंबईस्थित व्यावसायिका अलका बजोरिया यांची 'पॅशन ग्रीन' कंपनी आणि त्यांच्या कंपनीद्वारे दिल्या जाणार्या समग्र सुविधा त्यांच्या झाडा-पानांवरच्या प्रेमाची साक्षच देतात. आपल्या छंदाला व्यवसायाचे रूप देणार्या, नोकरीतून ब्रेक घेतल्यावर आपल्या सेकंड इनिंगमध्ये बागकामाच्या छंदाला कॉर्पोरेट स्तरावर नेणार्या व त्यात यश मिळवणार्या अलका यांचा हा खास परिचय मायबोली व संयुक्ताच्या वाचकांसाठी!
'पॅशन ग्रीन' सुरू करण्याअगोदरच्या तुमच्या वाटचालीविषयी सांगाल का?
यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.