ढापलेली गाणी

अन्य भाषेतून, प्रदेशातून हिंदी चित्रपटात / हिंदी चित्रपटातून अन्य भाषेत गाण्यांची उसनवार

Submitted by ------ on 9 May, 2021 - 15:36

हिंदी चित्रपटसृष्टीत मराठी / बंगाली / इंग्रजी / इटालियन / दाक्षिणात्य / पाकिस्तानी चित्रपटातील, अल्बम मधील गाणी उचललेली आहेत. काही काही रीमेक आहेत, काही परवानगीने घेतलेली आहेत. काहींचे श्रेय दिले जाते तर काहींचे श्रेय अजिबात दिले जात नाही.
अशा गाण्यांबद्दल बोलूयात.
पहिल्यांदा कुठले गाणे आहे त्याचा तपशील अथवा लिंक आणि नंतरच्या ओळीत ते कुठून उचलले आहे (स्त्रोत) त्याचा तपशील अथवा लिंक द्यावी.
उदा.

विषय: 

----- वेड्याच गाणं ------

Submitted by Ramesh Thombre on 15 November, 2011 - 00:40

तो तसा पागल आहे
डोळ्यावर त्याच्या गॉगल आहे
कधी कधी हसत नाही
रिकामाही बसत नाही.

हातात घेऊन एक काठी
वन-वन फिरत असतो
शांत सावलीत कधी बसून
उन्हा सारखा झुरत असतो.

त्याची कहाणी कळत नाही,
धागा सुद्धा मिळत नाही.

जाता जाता तो एकदा
सिनेमाला जाऊन आला.
येता येता तशीच एक
मैत्रीण सोबत घेऊन आला.

ती हि तशीच पागल असते
मधून मधून उगीच हसते .
हसनारीही पागल आहे
दिसणाराही पागल आहे !

दोघांची आता यारी आहे
ती त्याची प्यारी आहे .
दोघे खूप फिरत असतात,
चौपाटीवर चरत असतात.

तरीही तो पागल असतो
डोळ्यावर त्याच्या गॉगल असतो
कधी कधी रुसत नाही
मान लटकून बसत नाही.

आता त्याची ओळख पटली,

एक उनाड दिवस जगून पहा !

Submitted by Ramesh Thombre on 14 November, 2011 - 08:38

रोजच तुम्ही काम करता
घड्याळाच्या आकड्यांना हरता
आज ऑफिस दुरून पहा,
एकदा दांडी मारून पहा.

रोज जाता लोकलने
तेच स्टेशन ....
तीच लोकल
त्याच रुळावर तोच वेग
चिमणीवरचा तोच मेघ.
एकदा स्टेशन चुकउन पहा
एकदा लोकल हुकउन पहा.
एक उनाड दिवस जगून पहा !

रोजच चालतो वरण भात
रोजच असतात हातात हात
आज जोडी बदलून पहा
आज 'गोडी' बदलून पहा !

मग Picture वेगळा दिसेल
तुमचाच सिनेमा सगळा असेल !
.... तेव्हा Entry मारून पहा
थोडी Country मारून पहा !
एक उनाड दिवस जगून पहा !

रोज असते तेच गाव
रोज सांगता तेच नाव
एकदा भलत्याच गावी जाउन पहा
अन भलत्याच सारखं वागून पहा !
एक उनाड दिवस जगून पहा !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

--------- मन ---------

Submitted by Ramesh Thombre on 12 November, 2011 - 11:06

झाडावरती चढून मन
दूर दूर फिरत होतं,
उंच उंच जाऊन सुद्धा
जमिनीवरच ठरत होतं.

कधी जाऊन उन्हामध्ये
कोवळे चटके घेत होतं,
कधी येऊन सावलीत
मन माझा होत होतं.

असंच मन कधी कधी
वेगळं-वेगळं वागत असतं
हातात सर्व असतानाही
सगळं-सगळं मागत असतं.

कधी-कधी खट्टू होतं
कधी-कधी लट्टू होतं,
कधी ओझं डावलूनही
ओझ्याखाल्च तट्टू होतं.

तेव्हा मन गात नाही
मला सोडून जात नाही,
तेव्हाच ते माझा असतं.
त्यालाच त्याचं ओझं असतं.

- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
२६ ऑक्टोबर ०९

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ढापलेली गाणी