Submitted by Ramesh Thombre on 12 November, 2011 - 11:06
झाडावरती चढून मन
दूर दूर फिरत होतं,
उंच उंच जाऊन सुद्धा
जमिनीवरच ठरत होतं.
कधी जाऊन उन्हामध्ये
कोवळे चटके घेत होतं,
कधी येऊन सावलीत
मन माझा होत होतं.
असंच मन कधी कधी
वेगळं-वेगळं वागत असतं
हातात सर्व असतानाही
सगळं-सगळं मागत असतं.
कधी-कधी खट्टू होतं
कधी-कधी लट्टू होतं,
कधी ओझं डावलूनही
ओझ्याखाल्च तट्टू होतं.
तेव्हा मन गात नाही
मला सोडून जात नाही,
तेव्हाच ते माझा असतं.
त्यालाच त्याचं ओझं असतं.
- रमेश ठोंबरे (Ramesh Thombre)
२६ ऑक्टोबर ०९
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
चांगली आहे कविता. ढापलेली
चांगली आहे कविता.
ढापलेली गाणी म्हणजे काय?
ढापलेली गाणी म्हणजे
ढापलेली गाणी म्हणजे काय?>>>याचा काही अर्थबोध होत नाही.
धन्यवाद मंडळी ढापलेली गाणी
धन्यवाद मंडळी
ढापलेली गाणी म्हणजे काय?
ओर्कुट वर मी एक धागा लिहिला आहे या नावाने यात अनेक धागे आहेत ...
त्या धाग्याविषयी हे गाणे .... सर्व काही सांगेल ....
---------------- ढापलेल गाणं -----------------
सगळी गाणी ढापली आहेत
तरी सुद्धा आपली आहेत ... !
तुमचं आमचं गाणं आहे ....
ओठावरच लेणं आहे.
कधी सूर कधी ताल
शीर्षक सुद्धा ढापल आहे,
कधी शब्द, कधी स्तब्द
एक कडवं आपलं आहे ... !
प्रेरणा सुद्धा ढापली आहे
जश्याच तशी चोपली आहे,
कारण कवी आपला आहे
म्हणून तसाच ढापला आहे.
तुम्ही उगाच घाबरू नका
फक्त Inspiration घेतली आहे
हे काही 'बाईट' नाही
इतक सुद्धा 'वाईट' नाही.
जस गाणं हवा असत
दु:खात थोडं जगण्यासाठी
तशी प्रेरणा हवी असते
शब्द सुख भोगन्यासाठी
म्हणून गाणं ढापल आहे
तरी सुद्धा आपल आहे ... !
तुमच आमच होउन जायील
कवीची आठवण देऊन जायील.
- रमेश ठोंबरे
२६ ऑक्टोबर ०९
http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=826350&tid=5397035971403431624