नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.
मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.
मराठीत संख्या वाचण्याची पद्धती बदलण्यावरून काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बराच उहापोह आणि गदारोळ झाला. त्यानिमित्ताने सहज काही निरीक्षणं केली. सुदैवाने खालील संकेतस्थळ मला सापडले ज्यावर एक ते शंभरपर्यंतच्या सर्व संख्या तसेच त्यापुढील शतक सहस्र इत्यादी संख्या जगातील अनेक भाषांत कसे लिहितात ते सांगितले आहे (पण त्यात त्यांनी मराठी मात्र घेतलेली नाही!):
https://www.omniglot.com/language/numbers/
(भवताल नामक पर्यावरणविषयक जागृती करणार्या संस्थेतर्फे दरवर्षी एका विशिष्ट विषयाला वाहिलेला दिवाळी अंक प्रकाशित होतो. २०१८ च्या दिवाळी विशेषांकाचा विषय पारंपरिक जलसंधारण पद्धती हा होता. अंकाचे नाव 'उदक राखिले युक्तीने' (संपादक; अभिजित घोरपडे). त्यात प्रकाशित झालेल्या माझ्या लेखाची असंपादित/ संपादकीय काटछाट न केलेली आवृत्ती इथे पुनर्प्रकाशित करत आहे)
स्वमदत गट हा संशोधनाचा विषय घेतला तेव्हा हा विषय अफाट आहे याची थोडी कल्पना आली होती. मात्र या विषयात आजारागणिक प्रचंड गुंतागुंत आहे हे तेव्हा तितकेसे लक्षात आले नव्हते. प्रत्येक स्वमदत गट हा गंभीर समस्येसाठी कार्यरत असला आणि बहुतेक स्वमदत गटांची काम करण्याची पद्धत जी काही अंशी सारखी असली तरी त्यात खुप वैविध्य देखिल आहे. काम करण्याची पद्धत सारखी याचा अर्थ स्वमदत गटात विशिष्ट आजार असलेली किंवा समस्या असलेली माणसे एकत्र येऊन एकमेकांना मदत करतात. त्यांच्या नियमित सभा होतात, त्यांच्या गटातर्फे तज्ञांना बोलावून व्याख्याने ठेवली जातात. त्यांच्या सहली निघतात.
पुंजभौतिकी मध्ये तरंगकण द्विधावस्था (Wave–particle duality) अशी एक संकल्पना आहे. प्रकाशाच्या मुलभूत अवस्थेचे स्वरूप शोधताना असे लक्षात आले कि तो तरंग आणि कण या दोन्ही अवस्थेत आहे असे मानले तरच प्रकाशासंबंधी आढळून आलेल्या परस्परविरोधी गुणधर्मांची गणिती पडताळणी करता येते. त्यातूनच तरंगकण द्विधावस्था हि कल्पना पुढे आली.
भाग 5
कळवणवरून भराभर सरकता तांडा