तुम्ही सचिन सुप्रिया या जोडगोळीचा "तिरुमला ऑईल" ही जाहिरात पाहिली असेल. ही जाहिरात पाहिल्यानंतर मला पडलेले प्रश्न.
(१) "मला आवडणारे पदार्थ मी नेहमीच खातो" असे म्हणताना सचिन त्याची तुंदीलतनु आतमध्ये खेचतो असे वाटते का?
(२) सचिनचे सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ असा टी शर्ट घातला असावा का? (कारण तो खरोखर फिट्ट असेल तर शर्ट आतमध्ये खोचलेला दाखवला असता असे वाटते.)
(३) सुप्रिया ज्या पद्धतीने "तिरुमला ऑईल" असे कॅन दाखवत ठासून म्हणते तेंव्हा ती एखादी इंजिन ऑईलची जाहिरात करते असे वाटते का?
मित्रांनो नमस्कार,
आपण माझ्या लेखावर दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी आपला आभारी आहे..
या लेखावर आलेल्या काही प्रतिसादांवर मी व्यक्त होऊ इच्छितो.
'डर के आगे जीत है' हा हिंदी वाक्प्रचार बर्याचदा धाडसाचं महत्त्व सांगण्यासाठी वापरला जातो.पण खरंच भितीमुळे दरवेळी नुकसानच होतं का?दरवेळी 'भिती' ही प्रगतीतली धोंडच ठरते का?
असं म्हणतात, की जगामध्ये सर्वाधिक प्यायल्या जाणाऱ्या पेयांमध्ये चहाचा नंबर पाण्याच्या खालोखाल लागतो. चहाचे प्रकार आणि करण्याची पद्धत यामध्ये जगभरात प्रचंड विविधता आहे. आपल्यापैकीही बऱ्याच जणांना आपण करतो तीच पद्धत योग्य असे वाटते, आणि त्याच प्रकारचा चहा सहसा आपण पिण्यास प्राधान्यही देतो. दूध घालून केलेल्या चहामध्येही चहा, पाणी, दूध आणि साखरेचे प्रमाण, यांचे गुणोत्तर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे वेगवेगळे असू शकते, नव्हे, असतेच म्हणायला हवं खरं तर.
आमच्या आठवीच्या भूगोलाच्या बाईंनी आम्हाला सांगितले होते की युरोपचा भूगोल शिकायचा असेल तर आधी डीडी एल जे बघा आणि मग हे पुस्तक वाचा. बाईंचं तेव्हा लग्न व्हायचे होते त्यामुळे त्यांच्या डोळ्यात आम्हाला वेगळीच चमक तेव्हा दिसली होती त्याला हल्लीच शब्दप्रयोग सापडलाय 'डोळ्यात बदाम टाईप्स'. तर, ते होते कुरूप वेडे सारखे सर्व पुस्तकात एकच आडदांड मोठे भूगोलाचे पुस्तक कायम उपेक्षित असायचेच, त्याला या हुकुमामुळे आणखीच पुष्टी मिळाली. आम्ही आलो बघून डी डी एल जे. आणि आमची निरीक्षणे बाईंना दाखवली. त्यात आम्ही युरोपपेक्षा जास्त पंजाबची माहिती लिहील्याने बाईंच्या डोळ्यातले बदाम जाऊन तिथे पाणी आले.
नवीन वर्षाच्या पहिल्या लेखनाची सुरुवात सहचरींबद्दलच्या कृतज्ञतेच्या भावनेने करणे मला आवश्यक तर वाटते कारण खरोखर त्यांनी मला न मागता बरेच काही दिले आहे. शिवाय अशी कृतज्ञता व्यक्त करणे हा माझ्या आनंदाचाही भाग आहे. यामुळे पाय जमिनीवर राहण्यास मदत होते. सुरुवातीलाच स्वतःच्या मर्यादांबद्दल बोलावं लागेल. संशोधनाच्या दरम्यान व्यसनमुक्तीसाठी काम करणारी अनेक माणसे पाहिली. त्यांच्या मनात व्यसनी व्यक्तींबद्दल करुणा, सहानुभूती होती. अनेकांना स्वतःला व्यसनाचा अनुभव असल्याने त्यांच्याकडे अनुभवजन्य ज्ञानही होते.
नुकतीच झालेली घटना, ज्यात हैदराबादमधील एका तरुणीवर अत्याचार करून तिला जाळून मारून टाकण्यात आले. या आधी इथे अनेक चर्चा झाल्या असतील की असे अत्याचार का होतात काय मानसिकता कारणीभूत आहे ई.
मी सुद्धा याविषयी आंतरजालावर अनेक वेळा वाचलेले आहे. मागे एका इंग्रजी बातम्यांच्या संकेतस्थळावर भारतात अशीच एक घडलेली घटना नमूद केली होती, बातमी वाचून झाल्यानंतर त्याखाली आलेल्या टिप्पण्या वाचल्या ज्या खरेतर खरच या विषयावर प्रकाश पाडणाऱ्या होत्या. त्यात भारत आणि इतर पाश्चात्य देशांत असणारी सांस्कृतिक तुलना होती आणि त्यातून बरीच गहन चर्चा होतांना दिसली.
मराठीत संख्या वाचण्याची पद्धती बदलण्यावरून काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात बराच उहापोह आणि गदारोळ झाला. त्यानिमित्ताने सहज काही निरीक्षणं केली. सुदैवाने खालील संकेतस्थळ मला सापडले ज्यावर एक ते शंभरपर्यंतच्या सर्व संख्या तसेच त्यापुढील शतक सहस्र इत्यादी संख्या जगातील अनेक भाषांत कसे लिहितात ते सांगितले आहे (पण त्यात त्यांनी मराठी मात्र घेतलेली नाही!):
https://www.omniglot.com/language/numbers/