तू आणि मी
Submitted by mi manasi on 20 June, 2019 - 04:46
किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी?
अगदी कळवळून म्हणालीस....
स्वतःच घातलेली साद विसरुन
माझ्या प्रतिसादानेच विव्हळलीस
अगं, वेडी की खुळी तू....
तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे
हे गुणगुणत तुझा हात पकडलाय ना....
तो हे ऐकायला नाही!
आनंदात एकत्र झुलायला
अन् वेदनेत विसरायला नाही!
माझ्या अश्रूंना वाट करुन देणारी तू
तुझी दु:ख झेलणारा मी
माझ्या यशात स्वतःचं सूख शोधणारी तू
तुझ्या आनंदात बेभान होणारा मी
यात मोठं कोण? आणि कोण वेगळं?
कोण श्रेष्ठ? आणि कोण आगळं?
तरीही म्हणतेस....
किती रे त्रास करुन घेतोस माझ्यासाठी?
तुझ्या माझ्यात
एकच कृत्रिम अंतर उरलय आता....