चपलेवर चप्पल
"हल्लो, अरे काय? येऊ ना परवाच्याला?"
"अगं हो, ये की, मी वाट पाहतोयच."
"अरे मग सांगणार कधी?"
"आत्ता सांगतोय ना?"
"बरं. शार्प अॅट ट्वेल्व, चालेल?"
"के, डन!"
मनालीशी बोलून फोन बाजूला ठेवत विनायक हापिसातल्या खुर्चीवर रेलत-रेलत 'जाने कहाँ गए वो दिन' मोड मधे गेला. चारेक वर्षांपूर्वींची ओळख, मग जवळीक अन् मग बरंच काही. ती मॅरीड असूनही आपण गुंततोय हे जाणूनही गुंतत गेला. तिचंही तसंच काहीसं. चूक-बरोबर, खरं-खोटं सार्याचा विचार बाजूला ठेवत दोघे एकत्र आलेले. दिवस, भेटी, ओढ सारंच हवंहवंस. आजही क्षण अन् क्षण तसाच जिवंत, हुबेहूब.