कल्लोळ
Submitted by SharmilaR on 18 November, 2022 - 23:46
वृत्तांत लिहिणारे लिहितील तेंव्हा लिहितील , तो पर्यंत या काही नोंदी :
इन नो पर्टिक्युलर ऑर्डर
कल्लोळात जितक्यावेळा टचकन पाणी आलं लोकांच्या डोळ्यात त्यांनी प्रत्येकांनी दर वेळेस एकेक डाईम ( १० सेंट्स ) मायबोलीला दिल्यास मायबोली डॉनल्ड ट्रंपच्या एम्पायरपेक्षा जास्त गडगंज होईल . एरवी देखील मायबोलीवर रडिवलंत अन टचकन पाणीला एकेक डाईम चार्ज केल्यास मायबोली वॉरेन बफेटला मागे टाकेल .
स्वाती अगदी निरागस, साधी भोळी आहे, तिला कुण्णाकुण्णचंही कुण्णाशीही भांडण झालेलं आवडत नाही