एका कामानिमित्त कोकणात एका दिवसासाठी जाणे झाले.. ही वेळ होती नुकतेच आगमन केलेला पाउस अनुभवण्याची.. मग एक दिवस का होईना... आतापर्यंत गणेश चतुर्थीत जाणे होत असल्याने पावसात स्थिरावलेला निसर्ग पाहीला होता.. जून मध्ये जाण्याची पाहिलीच वेळ.. शिवाय चतुर्थीत आतापर्यंत कोकण ट्रेनच्या जनरल डब्याने प्रवास करण्याचे धाडस केले होते.. पण आता उन्हाळी सुट्टी संपल्याने ऑफ सिझन..! फारशी गर्दी नाही.. स्लीपर क्लासची तिकीट सहज मिळून गेली.. खिडकीजवळची सीट नाही मिळाली तरी बसायचे कुणाला होते.. दरवाज्यात उभे राहून पावसाचे शिंतोडे अंगावर झेलण्याची मजा काही औरच..
मु.पो. तेर्से बांबार्डे, कुडाळ
कोकणात घेउन जाणारा NH 17 :
प्रचि १ :
प्रचि २
प्रचि ३
प्रचि १:
प्रचि २:
प्रचि ३:
मु. पो. तेर्से बांबार्डे, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.. ! पुन्हा एकदा भेट ! गेल्यावर्षी उन्हाळ्यात जाउन आलो होतो नि इथे फोटो डकवले होते.. आता निमित्त होते गणेशचतुर्थीचे... गणपतीत गावी जायचे म्हटले की लगेच मन हलके हलके वाटू लागते.. कोकणातला बाप्पा तर तन-मनात भिनलेला असतो.. शिवाय डोळ्यासमोर भातशेतीचे लांबच्या लांब हिरवे पट्टे उभे राहतात... कानांमध्ये भजनांचा आवाज दुमदुमू लागतो.. एकदम आल्हाददायक वातावरण निमिर्तीचा भास होतो... उगीच नाही गणपतीला कोकणात जाणार्या गाडया फुल असतात..
मु.पो. तेर्से बांबार्डे, तालुका - कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग... म्हणजेच कोकणात असलेला एक गाव.. माझाच गाव ता... गेली पाच वर्ष जाउक जमणा नाय.. तसा माका तर गणपतीतच कोकणात जाउक आवडता.. पण म्हटला उन्हाळ्यातच जाउन येउ.. तसापण शालेय शिक्षणानंतर उन्हाळ्यात कधीच गावी गेलो नव्हतो.. म्हणान जमात तसा फक्त तीन दिवसाचो मुक्काम करुन इलय.. या भेटीत हातात डिजीकॅम असल्याने जास्तच उत्सुकता