कळ
Submitted by शिवकन्या शशी on 18 January, 2018 - 21:27
जुनीच आहे. आतल्यासहित माणूस मधे होती.
----------------------------------
खोल खोल आत रूतलेली
बेडकाच्या जिभेसारखी बाहेर येणारी
कुठली ही भिती!
दुबकत्या पावलांनी येऊन
हिडीस हातांनी गळा आवळणारी
कसली ही कळ!
मेंदूच्या चिंधड्या उडवणारा
अदृश्यपणे आयुष्य थिजवणारा
कुठून होतो वार!
विकृत उबळीसरशी
साचलेलं खरकटं ओकणारा
कुठून येतो तिरस्कार!
जिवंतपणाची खूण असलेला
उरापोटी धपधपत चालणारा
का अचानक अडकतो श्वास!
- नी