दोन चार दिवसांपूर्वी योगेश२४ नावाच्या मायबोलीकराने 'गाणी मनातली (आवडलेली मराठी गाणी) या विषयावर लिहिताना बालगंधर्वांच्या संदर्भात श्रीराम रानडे यांनी लिहिलेल्या एका लेखाचा उल्लेख केला होता.
http://www.maayboli.com/node/16889?page=6
माझ्या माहितीच्या काही मंडळींनी ' हे तुझे बाबा का गं' अशी विचारणा केली आणि या मालिकेतले इतर लेख वाचायची इच्छाही व्यक्त केली.
मराठी विश्व नाट्य संमेलनाचं औचित्य साधून गेल्या ३ महिन्यात माझ्या वडिलांचे नाट्यविषयाशी निगडीत असलेल लेख लोकसत्ता मधे प्रसिद्ध होत होते/आहेत.
श्री. विजय तेंडुलकर नक्की कसे होते, हा एक अतिशय अवघड प्रश्न. त्यांचं व्यक्तिमत्त्व इतकं बहुपेडी होतं की खरे तेंडुलकर कसे होते, हे समजून घेणं खूप कठीण आहे. नाटककार म्हणून जागतिक ओळख असलेल्या तेंडुलकरांनी चित्रपट, दूरदर्शन मालिका ही माध्यमं लीलया हाताळली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या दृक्-श्राव्य विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. अनेक सामाजिक चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता.
'व्हॉटस युअर राशी ?' चित्रपटात प्रियांका चोप्राने केलेल्या १२ भूमिका व 'शंभु माझा नवसाचा' या २००६ साली प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटात राजेश शृंगारपुरेने केलेल्या १२ भूमिका याविषयी बातम्या वाचनात आल्या. त्या अनुषंगाने मराठी चित्रपटातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी चित्रपट विभागात नवीन धागा सुरू केला.
त्याच्या प्रतिसादात काही जणांनी मराठी नाटकातीलही दुहेरी / विविध भूमिका कळवल्या आहेत.
मराठी नाटकातील दुहेरी / विविध भूमिका संकलित करण्यासाठी हा धागा सुरू करत आहे.
आपल्याला माहित असलेल्या दुहेरी / विविध भूमिका कळवत रहा.
प्रत्येक नोंदीसाठी खालील माहिती जमा करता येईल.
रंगकर्मींच्या अनेक पिढ्या तेंडुलकरांनी वाट सुकर केली, म्हणून दर्जेदार कलाकृती निर्माण करू शकल्या. मराठी रंगभूमीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्या श्री. अतुल पेठे यांनाही तेंडुलकरांनी व त्यांच्या नाटकांनी प्रभावित केलं होतं.