परवा मुंबई - पुणे प्रवासात मस्त धुकं भेटलं. दुपारी नऊ -साडेनऊला सुर्य चंद्रासारखा दिसत होता, मधूनच दिसेनासाही होत होता!
मोबाइलने, बसच्या काचेतून काढलेले फोटो आहेत, समजून घ्या!
अग तुला घाबरण्याचे काही एक कारण नाहीये, अज्जीबात नाही, फोनवर एक छोटासा आवाज बोलला.आणि तेही मी घाबरलेली नसतानाच..मला फ़क़्त तशी अक्टिंग करायची होती..पण तो फोन वर सुटलेलाच होता..म्हणाला छोट्या मला, अग माणूस तर शंभर वर्ष जगतो, आपण १० हजार बिल्लीअन इअर्स बद्दल बोलतोय..हा लहानगा आवाज म्हणजे सहा वर्षांचा एक माझ्या भावाचा संगीत शिक्षेचा विद्यार्थी...आणि हा मग माझी का समजूत घालतोय? मी तर त्याला ओळखतही नाही..