अपशकुन

अपशकुन

Submitted by निवडुंग on 10 April, 2011 - 18:09

तुझ्या देव्हार्‍यातली सांजवात
काल अचानक फडफडत राहिली
माझ्या काळजाचा ठोका चुकवत..
रित्या हातांचा लगबग आडोसा
निमीषार्धात तिला सावरायला
निष्ठूर वाऱ्यापुढे हतबल होण्याआधी..

पण तुझी सांजवात केव्हाच विझली होती.
उरला होता फक्त भयाण काळामिट्ट अंधार,
चुटपुटणारं मन,
आणि जळकट तेलाचा असह्य दर्प..
खरंय..
अपशकुनच तर झाला होता..
तुझ्या देव्हार्‍यात माझा पाय जो पडला होता..

गुलमोहर: 
Subscribe to RSS - अपशकुन