Submitted by निवडुंग on 10 April, 2011 - 18:09
तुझ्या देव्हार्यातली सांजवात
काल अचानक फडफडत राहिली
माझ्या काळजाचा ठोका चुकवत..
रित्या हातांचा लगबग आडोसा
निमीषार्धात तिला सावरायला
निष्ठूर वाऱ्यापुढे हतबल होण्याआधी..
पण तुझी सांजवात केव्हाच विझली होती.
उरला होता फक्त भयाण काळामिट्ट अंधार,
चुटपुटणारं मन,
आणि जळकट तेलाचा असह्य दर्प..
खरंय..
अपशकुनच तर झाला होता..
तुझ्या देव्हार्यात माझा पाय जो पडला होता..
गुलमोहर:
शेअर करा
अशक्य...
अशक्य...
धन्यवाद मुक्ता, इतका "अशक्य"
धन्यवाद मुक्ता,
इतका "अशक्य" प्रतिसाद दिल्याबद्दल.. आभार..
छानच. पुलेशु.
छानच. पुलेशु.
बासंच...अशक्य!!...एवढी
बासंच...अशक्य!!...एवढी दूर्लक्षित कशी राहीली ही रचना...कातील!
निनाव, आभार.. ऋतुवेद.. खूप
निनाव,
आभार..
ऋतुवेद..
खूप आभार !
वाह... ऋतुवेदला अनुमोदन.
वाह...
ऋतुवेदला अनुमोदन.
हंसा ! खूप आभार !
हंसा !
खूप आभार !