शेवटचा दिस गोड व्हावा... या डॉ अनिल जोशी यांच्या पुस्तकात शीर्षकावरुनच वाचकांना कल्पना येते की पुस्तक कोणत्या विषयवरील आहे. डॉ अनिल जोशी हे पंढरपूर येथील नगरपरिषदेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांनी बी.जे मेडिकल महाविद्यालयात न्यायवैद्यकशास्त्राचे अधिव्याखाता म्हणून ही काम केले. त्यामुळे मृत्यू या विषयाशी घनिष्ट संबंध त्यांनी मानवी नात्यांच्या गुंतागुंतीत सहृदयतेने पाहिला. त्यातूनच त्यांना या विषयावर पुस्तक लिहिण्याची प्रेरणा मिळाली.
२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे.