तरही गझल

दु:ख आता फार झाले..

Submitted by मी मुक्ता.. on 30 January, 2011 - 07:00

सोसण्याच्या पार झाले
दु:ख आता फार झाले..

शोषणारे देशप्रेमी
भांडणारे ठार झाले..

काय कुठल्या चाहुलींनी
लांडगे होश्शार झाले..

झेलली मी वादळे पण,
आसवांचे वार झाले..

सोयरे सोडून जाता,
झुंजणे बेकार झाले..

रात मागे चांद नुसता,
चांदणे बेजार झाले..

तू दिलेले गंध गेले,
श्वास आता भार झाले..

मारव्याची साद येता,
आज मी गंधार झाले...

गुलमोहर: 

तुझ्याविना

Submitted by तुषार जोशी on 25 January, 2011 - 05:58

तुझ्याविना या भकास वाटा
तुझ्याविना हा प्रवास खोटा
तुझ्यामुळे ही मिजास आहे
तुझ्याविना मी उजाड गोटा

तुझ्याच तारांमुळे मनाची सुरात आली सतार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

तुला बघावे किती दिशांनी तुला स्मरावे किती खुणांनी
मरून व्हावे जिणे सुगंधी अशी गुलाबी कट्यार आहे

कधी अबोला कधी दुरावा कधी तुझ्याशी उगाच त्रागा
तारीहि वर्षाव काळजीचा तुझ्यात प्रीती अपार आहे

बघा जरा हे जपून वाचा धरून ठेवा हृदय उराशी
नसेल माझा प्रभाव साधा अजून शब्दास धार आहे

हवे तसे ती करीत नाही खट्याळ हट्टी असे प्रिया ही
दुखावणाऱ्या तिच्या ढगाला तरी सुखाची किनार आहे

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

तुझ्याविना या जगात माझा.. या आठवड्याचा तरही...

Submitted by मी मुक्ता.. on 17 January, 2011 - 23:23

जाणकारांच्या सूचना/प्रतिक्रिया/बदल अपेक्षित...

http://merakuchhsaman.blogspot.com/

सातीच्या सुचना आणि प्रत्यक्ष मदत यामुळे इथे चांगले बदल करणं शक्य झाल मला.. Happy खूप आभार.. मोठ्या टायपातले तिचे बदल add करून गझल पुन्हा छापली आहे.. Happy

---------------------------------------------------------------------------------

सदैव दिसशी मला सभोती तुझाच कायम विचार आहे
तुझ्याविना या जगात माझा, जगावयाला नकार आहे..

जुनेच काही मनात दाटे, फुटेल जेव्हा नवी पल्लवी
असो नसो हा वसंत आता, मनात माझ्या बहार आहे..

भिनून जावा नसानसांती ,मला नव्याने असा डसावा

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - तरही गझल