Submitted by तुषार जोशी on 25 January, 2011 - 05:58
तुझ्याविना या भकास वाटा
तुझ्याविना हा प्रवास खोटा
तुझ्यामुळे ही मिजास आहे
तुझ्याविना मी उजाड गोटा
तुझ्याच तारांमुळे मनाची सुरात आली सतार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
तुला बघावे किती दिशांनी तुला स्मरावे किती खुणांनी
मरून व्हावे जिणे सुगंधी अशी गुलाबी कट्यार आहे
कधी अबोला कधी दुरावा कधी तुझ्याशी उगाच त्रागा
तारीहि वर्षाव काळजीचा तुझ्यात प्रीती अपार आहे
बघा जरा हे जपून वाचा धरून ठेवा हृदय उराशी
नसेल माझा प्रभाव साधा अजून शब्दास धार आहे
हवे तसे ती करीत नाही खट्याळ हट्टी असे प्रिया ही
दुखावणाऱ्या तिच्या ढगाला तरी सुखाची किनार आहे
तुझ्या कृपेचा सदा ऋणी मी तुला विनाधाक मागतो मी
चिता जळावी अहंपणाची मनात अंधार फार आहे
तुषार जोशी, नागपूर
२७ जानेवारी २०११, ०८:३०
(जीवघेणी तरही ओळ दिली म्हणून आयोजकांना शतश: आभार)
गुलमोहर:
शेअर करा
जीवघेणी तरही ओळ दिली म्हणून
जीवघेणी तरही ओळ दिली म्हणून आयोजकांना शतश: आभार
~ तुषार
कधी अबोला कधी दुरावा कधी
कधी अबोला कधी दुरावा कधी तुझ्याशी उगाच त्रागा
तरीहि वर्षाव काळजीचा तुझ्यात प्रीती अपार आहे >>> हा शेर आवडला
निसंक्कोच >>> ह्यात उच्चारामुळे 'नि' दीर्घ' होतो असे वाटते
पुलेशु
मरून व्हावे जिणे सुगंधी अशी
मरून व्हावे जिणे सुगंधी अशी गुलाबी कट्यार आहे
चिता जळावी अहंपणाची मनात अंधार फार आहे
ह्या सुट्या मिसर्यांसाठी जियो!!
बघा जरा हे जपून वाचा धरून ठेवा हृदय उराशी
नसेल माझा प्रभाव साधा अजून शब्दास धार आहे
हाही आवडला...
आवडली
आवडली
फार् सुंदर गझल
फार् सुंदर गझल तुषार....
काही सुटे मिसरे अफलातून आले आहेत...
तुझ्या कृपेचा सदा ऋणी मी तुला निसंक्कोच मागतो मी
चिता जळावी अहंपणाची मनात अंधार फार आहे
हा शेर दणकेबाज झाला आहे.
मी दिलेल्या तरहीवर गझल केल्याबद्दल खरं तर आपलेच आभार.
कारवा आहे गजलचा,जायचे आहे पुढे,
हे मराठी गजलवैभव्,न्यायचे आहे पुढे. ..
कट्यार अफाट! बाकीही सगळेच शेर
कट्यार अफाट! बाकीही सगळेच शेर मस्त! गझल खूप खूप आवडली.
पाटील साहेब नि:संकोच बद्दल
पाटील साहेब नि:संकोच बद्दल लक्षात आले, तिथे विनाधाक केले आहे
धन्यवाद मंडळी
धन्यवाद तुषार, आता तो शेर डॉक
धन्यवाद तुषार, आता तो शेर डॉक म्हणताहेत तसा दणकेबाज झाला आहे