Vampire Slayer !
एक व्हॅम्पायर मारला बघा मी.
फार रक्त शोषून घेतले होते याने माझे आजवर.
एक व्हॅम्पायर मारला बघा मी.
फार रक्त शोषून घेतले होते याने माझे आजवर.
एक जानेवारीची सकाळ निसर्गाच्या सानिध्यात, फुला-फुलांमभून मध गोळा करत भिरभिरणाय्रा फुलपाखरांच्या सहवासात गेली तर त्यापेक्षा नवीन वर्षाची सुंदर सुरवात आणखी ती काय होणार. ड्युटीच्या तासांमुळे थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनचे बारा वाजलेच होते, पण त्यामुळे सकाळी मात्र साडेपाच वाजताच जाग आली. पनवेलवरून ठाणे-ओवळा ईथे पोहोचायला जवळपास दिड तास लागतो, ट्रॅफिक मधे फसल्यावर किती वेळ लागेल याचं कॅलक्युलेशन करून घरातुन जरा लवकरच निघालो. आदल्या दिवशी मि. राजेंद्र ओवळेकरांकडे बोलणे झालेच होते. सूर्यकिरण आल्याशिवाय फुलपाखरे येत नाहीत त्यामुळे त्यांनी सकाळी ९:३० पर्यंत पोहचायला सांगितले होते.