#bmm2024
येवा, बे एरिया आपलोच असा..
डोक्यावर तळपता सूर्य, पायाखाली गार मऊशार वाळू, डोळ्यांसमोर अथांग पसरलेली निळाई, लांबवर अस्पष्ट दिसणारी क्षितिजरेखा, एका बाजूला दूरवर कुठे त्या थंडगार लाटांवर आरूढ होण्याचा चंग बांधलेले नवशिके सर्फर, तर दुसऱ्या बाजूला किनाऱ्यावर हळुवार पसरत जाणाऱ्या फेसाळ लाटामध्ये आई बाबांबरोबर पाय ओले करत फिरणारे बाळ-गोपाळ, समुद्रकाठच्या रस्त्याने हा सारा नजर टिपत, ताजी हवा अनुभवत मजेत जाणारे सायकल स्वार… हे सर्व दृश्य होता होईल तेव्हढं मनात साठवून ठेवत, गार हवेच्या झुळुका खात असताना मला क्षणभर वाटून गेलं की गेल्या जन्मी नक्कीच काही चांगलं केल असाव का, म्हणून इतक्या विलॊभनीय ठिकाणी मनात आलं की अर्ध्या ता
बीएमएम २०२४ स्मरणिका साहित्य आवाहन!
नमस्कार,
आपल्याला माहीत असेलच की ह्या वेळचे, २०२४चे, BMM अधिवेशन बे एरिया मध्ये होत आहे. या अधिवेशनाची आठवण म्हणून एक विशेषांक काढला जातो, तो म्हणजेच स्मरणिका. यंदाची स्मरणिका नेहेमी सारखी फक्त छापील स्वरूपातच न काढता, ई-बुक आणि ऑडिओ बुक ह्या स्वरूपातही काढली जाणार आहे. त्यामुळे ती जगाच्या कानाकोपऱ्यातून वाचता आणि ऐकता येईल.
मराठी माणसाने साता समुद्रापार येऊन अमेरिकेत रुळताना स्वतःचे मराठीपण आणि परंपराही जपल्या. त्यालाच मध्यवर्ती ठेऊन या वेळच्या स्मरणिकेचा विषय आहे,
"मराठी माणसाला अमेरिकेचा रंग: अमेरिकेला मराठी माणसाचा रंग".
अमेरीकेतील मराठी चित्रकारांकरता..
सप्रेम नमस्कार,
पुढील वर्षी, जून २०२४ मध्ये बे एरिया, कॅलिफोर्निया, होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानिमित्त निघणाऱ्या स्मरणिकेसाठी मुखपृष्ठ स्पर्धा जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. स्मरणिकेचा विषय मुखपृष्ठमधून प्रतीत व्हावा अशी अपेक्षा आहे. मुखपृष्ठाकरता फक्त चित्र अपेक्षित आहे. स्मरणिका शीर्षक आणि घोषवाक्य मुखपृष्ठावर घालण्याचे काम स्मरणिका टीम करेल.
ही स्पर्धा उत्तर अमेरिका आणि कॅनडा मध्ये रहाणाऱ्या सर्व मराठी लोकान्साठी खुली आहे. तरी आपण आपल्या ओळखीच्या चित्रकारान्पर्यन्त ही बातमी जरुर पोहोचवा.
रोख पारितोषिक - $251
अमेरीकेतील सर्व मराठी चित्रकारान्करता...
सप्रेम नमस्कार,
पुढील वर्षी, जून २०२४ मध्ये बे एरिया, कॅलिफोर्निया, होणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनानिमित्त निघणाऱ्या स्मरणिकेसाठी मुखपृष्ठ स्पर्धा जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे. स्मरणिकेचा विषय मुखपृष्ठमधून प्रतीत व्हावा अशी अपेक्षा आहे. मुखपृष्ठाकरता फक्त चित्र अपेक्षित आहे. स्मरणिका शीर्षक आणि घोषवाक्य मुखपृष्ठावर घालण्याचे काम स्मरणिका टीम करेल.
ही स्पर्धा उत्तर अमेरिका आणि कॅनडा मध्ये रहाणाऱ्या सर्व मराठी लोकान्साठी खुली आहे. तरी आपण आपल्या ओळखीच्या चित्रकारान्पर्यन्त ही बातमी जरुर पोहोचवा.
![Subscribe to RSS - #bmm2024](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/misc/feed.png)