बीएमएम २०२४ स्मरणिका साहित्य आवाहन!
Submitted by छन्दिफन्दि on 2 September, 2023 - 02:56
नमस्कार,
आपल्याला माहीत असेलच की ह्या वेळचे, २०२४चे, BMM अधिवेशन बे एरिया मध्ये होत आहे. या अधिवेशनाची आठवण म्हणून एक विशेषांक काढला जातो, तो म्हणजेच स्मरणिका. यंदाची स्मरणिका नेहेमी सारखी फक्त छापील स्वरूपातच न काढता, ई-बुक आणि ऑडिओ बुक ह्या स्वरूपातही काढली जाणार आहे. त्यामुळे ती जगाच्या कानाकोपऱ्यातून वाचता आणि ऐकता येईल.
मराठी माणसाने साता समुद्रापार येऊन अमेरिकेत रुळताना स्वतःचे मराठीपण आणि परंपराही जपल्या. त्यालाच मध्यवर्ती ठेऊन या वेळच्या स्मरणिकेचा विषय आहे,
"मराठी माणसाला अमेरिकेचा रंग: अमेरिकेला मराठी माणसाचा रंग".