बुमरँग !
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सायकल वरच्या प्रभातफेरीला निघालो. आज रविवार असल्याने जरा लांबचा पल्ला गाठणार होतो. मावळातल्या खेड्यापाड्यातून सकाळी सकाळी सायकल चालवायचा आनंद काही वेगळाच आहे. मंदिराच्या घंटानादाशी जुगलबंदी करणारा बैलांच्या गळ्यातला घंटेचा आवाज. थंड हवेवर पसरलेला गोठ्यातील गोमुत्राचा गंध. अश्या वातावरणात सायकल चालवायचा आनंद काही औरच. अंगणात पहाटेची झाडलोट सुरु होती. एवढ्यात, अश्या सुरेल सकाळी (बे)सूर कानावर पडले. समोरच्या गल्लीत दोन बायका हे (बे)सूर आलापत होत्या. एवढ्या सकाळी भांडण? अश्या रामप्रहरी या बायांना भांडणासाठी कोणता वैश्विक मुद्दा मिळाला असेल?