'गेम ऑफ थ्रोन्स' बद्दल खूप ऐकून होतो. त्याच्याशी तुलना करून भारतीय चित्रपटांन तुच्छ लेखणंही वाचलं, ऐकलं. हे सगळं इतकं झालं की आधी कंटाळा, मग वैताग आला. आणि मग असं वाटलं की, आता तर पाहतोच काय आहे तरी काय नक्की हा गेम. जवळजवळ इरेला पेटून सगळेच्या सगळे सीजन्स मिळवले. माझं इंग्रजी खूपच चांगलं असल्याने मला सबटायटल्ससुद्धा हवीच होती. तीही मिळवली आणि सगळं काही हाती आल्यावर पोटात भुकेचा गोळा उठलेला असताना ज्या पवित्र्यात आपण चारी ठाव वाढलेल्या पानासमोर बसतो, त्याच पवित्र्यात मी पीसीसमोर बसलो.
झी वरील राखेचा नंतर कलर्सवर देखील "चाहूल" ही हॉरर मालिका आली..
आणि आता झी युवा वर "गर्ल्स हॉस्टेल" ही नवीन हॉरर मालिका येत आहे..
त्यासाठी हा नवीन धागा
https://youtu.be/zpIwYArUMes या लिंक वर प्रोमो बघायला मिळेल.
सोनी टीवी वर रोज रात्री 9.00 वाजता बेहद ही मालिका लागते. खरं तर मालिका सुरू होऊन बरेच महिने झालेत.. पण सुरवातीपासून ही मालिका फार आवडतेय. मी एकही एपिसोड मिस करू शकत नाही.. रोज नवीन सस्पेन्स, वेगवान घडामोडी, सर्व कलाकारांचा मस्त अभिनय.. ह्या बाबी मस्त जमून आल्या आहेत.
सर्वात बेस्ट म्हणजे माया.! अभिनय, दिसणं, अटिटयूड.. मस्त कॅरी करतेय.. तिच्या साठी हा धागा.. 

पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट पुर्ण झाल्या. आता इथे या चर्चा करुया. 
तू नाहीस जवळ माझ्या,
पण तूझ्या आठवणी येतात भेटायला..
शक्य नाही तुला मिळवण,
मन तयार नाही स्वीकारायला..
आठवतात तूझे बोल,
ती स्वप्नाची दूनीया..
कळलं नव्हत तेंव्हा,
भास आहे वेडया मनाचा..
तुझ्या स्वप्नांनी रोज,
छळलं आहे मला..
स्वप्ने दाखवली आकाशाची,
आता जमिनीवर टाकलं आहे मला..
मोडली आहेत स्वप्ने माझी,
आता कशाची भीती नाही..
भोग आता संपले माझे,
दैव माझे माझ्या हाती..
इच्छा आता एवढीच कि,
कळावी माझी प्रित तुला..
परत नाही भेटणार हा वेड़ा,
कळेल ना गं, प्रिये तूला..
लागिरं झालं जी... ही नवी मालिका झी मराठीवर १ मे २०१७ पासून सोम - शनि पाहायला मिळेल. चर्चेकरता हा धागा. काय चांगलंय काय गंडलंय, काथ्याकूट इ... चला चालू व्हा 
तुफान आलंया ही मालिका झी मराठीवर ८ एप्रिल पासून चालू होतेय संध्याकाळी ०९३० वाजता. तर चर्चा, काथ्याकूट, काय चांगलं, काय न पटणारं हे बोलायला हा धागा...
(जशी मिळेल तशी बाकी माहीती इथे डकवेन)
यंदाचे झीटीव्हीवर चालू झालेले सारेगमप लिटल चँप्स मधले स्पर्धक खूपच दमदार वाटतात. सध्या टॉप १४ ची निवड चालू आहे. अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास खूप धमाल आणणार असे वाटतेय.
तुम्ही पाहताय की नाही? हिमेसभाय परिक्षक म्हणून आहेत म्हणून सुरुवातीला पाहण्यात उत्साह नव्हता पण आता त्याचे एपिसोड चुकवावेसे वाटत नाहीत.
या स्पर्धेबद्दल इथे चर्चा करू या.
bhaDipa - भारतीय डिजिटल पार्टी
या चॅनेल ला कुणी subscribe केले आहे का? त्यांची कास्टिंग couch विथ अमेय अँड निपुण हि खूप मजेशीर series आहे, सध्या season २ चालू kelay. general theme अशी आहे कि अमेय आणि निपुण ला मूवी बनवायची आहे सो they call a guest and try तो lure him /her in acting /producing d movie.
त्याच बरोबर रास्ता कुणाच्या बापाचा नाही, सोसायटी कुणाच्या बापाची नाही ह्या वेब शॉर्ट्स पण छान hotya
Marathi मध्ये प्रथमच असं काही होत आहे. आणि quality हि चांगली आहे.
admin - please delete d thread if its duplicate
तर, दिल दोस्ती दोबारा ही नवी मालिका झी मराठीवर १८ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०३० वाजता प्रक्षेपित होईल. दिल दोस्ती दुनियादारीचा हा दुसरा भाग...
तर याविषयी चर्चा, काथ्याकूटास या धाग्याचे प्रयोजन. चलो, शुरू करो... 