लॅपटॉप दुरुस्ती - ठाणे
Submitted by स्वाती२ on 20 November, 2015 - 08:18
माझ्या आईचा लॅपटॉप आजकाल अधून मधून अचानक कर्र असा काहीतरी आवाज करुन बंद होतो. थोड्या वेळाने पुन्हा सुरु केला तर व्यवस्थित चालतो. पण असे वारंवार होत आहे. लॅपटॉपचा वापर स्काइपसाठी होतो. माझ्याशी स्काईप करताना गेल्या आठवड्यात दोनदा असे झाले. तर या वारंवार आजारी पडणार्या लॅपटॉपला काय झाले आहे त्याचे निदान/दुरुस्तीसाठी खात्रीशीर दुकान /सेवा देणारे सुचवाल का? आई वसंतविहार परीसरात रहाते. त्यामुळे त्या भागातील असल्यास जास्त सोईचे होईल मात्र तसा आग्रह नाही.
विषय: