Submitted by स्वाती२ on 20 November, 2015 - 08:18
माझ्या आईचा लॅपटॉप आजकाल अधून मधून अचानक कर्र असा काहीतरी आवाज करुन बंद होतो. थोड्या वेळाने पुन्हा सुरु केला तर व्यवस्थित चालतो. पण असे वारंवार होत आहे. लॅपटॉपचा वापर स्काइपसाठी होतो. माझ्याशी स्काईप करताना गेल्या आठवड्यात दोनदा असे झाले. तर या वारंवार आजारी पडणार्या लॅपटॉपला काय झाले आहे त्याचे निदान/दुरुस्तीसाठी खात्रीशीर दुकान /सेवा देणारे सुचवाल का? आई वसंतविहार परीसरात रहाते. त्यामुळे त्या भागातील असल्यास जास्त सोईचे होईल मात्र तसा आग्रह नाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शक्यतो कंपनीच्या अधिक्रुत
शक्यतो कंपनीच्या अधिक्रुत सेवा केद्रांत जा, बहुतेक वेळेला इतर तंत्रन्य निर्निराळे प्रयोग करुन लॅपटॉपची वाट लावतात , अनुभवावरुन
शक्यतो कंपनीच्या अधिक्रुत
शक्यतो कंपनीच्या अधिक्रुत सेवा केद्रांत जा, बहुतेक वेळेला इतर तंत्रन्य निर्निराळे प्रयोग करुन लॅपटॉपची वाट लावतात , अनुभवावरुन +१
आम्हाला एकदा दुस-याची पॉवर कॉर्ड दिली होती जी आमच्या ख-या पॉवर कॉर्ड पेक्षा खुप छोटी होती. आमचीच दे अस सांगीतल्यावर उद्धटपणे तीच कशाला पाहीजे , काय फरक पडतो असे विचारले होते.
धन्यवाद अर्जून आणि स्पॉक.
धन्यवाद अर्जून आणि स्पॉक. लॅपटॉप तोषीबाचा आहे. आंतरजालावर शोधले असता एक मीरा रोड भागात सेंटर आहे असे कळले. त्यांच्याकडे चौकशी करायला सांगते.
तोशिबाची फक्त दोनच सर्विस
तोशिबाची फक्त दोनच सर्विस सेंटर आहेत
Name: M/s Ensure Support Services (India) Limited.
Address: Unit No 8,9,10,11,12 Ground floor,B wing, Classique Center, 26 Mahal Indl estate ,Off Mahakali Caves road Andheri (East), Mumbai - 400059
Phone: 022-61555314
Name: Bluecom Infotech Pvt. Ltd.
Address: "First Floor, Prakash Kunj, VN Purav Marg, S.T. Road, Chembur (East), Behind Vodafone Galary, Mumbai-400071
Phone: 022-67247272
Email-ID: toshiba.support@bluecom.co.in
वाशीला जाणे सोपे पडेल कां??
वाशीला जाणे सोपे पडेल कां?? तसं असेल तर मी एक खात्रीलायक सर्विस सेंटर सुचवु शकेन,
धन्यवाद भ्रमर. वाशीला जाणे
धन्यवाद भ्रमर. वाशीला जाणे बहुतेक शक्य होणार नाही. खरे तर कुणी घरी येवून करणार असेल तर बरे पडेल. आई-बाबा दोघेही ७५+ आहेत. पण तुम्ही इथे माहिती देवून ठेवा. मी जालावर शोधले तर ठाण्यातील ठिकाणांची माहिती http://www.servicecentreinfo.in/toshiba-laptop-service-centre-in-thane/ इथे माहिती मिळाली. बहुतेक ते ऑथराइज्ड नसावेत. तुम्ही दिलेल्या वरच्या दोन्ही ठिकाणी कॉन्टॅक्ट करायला सांगते. मी हा लॅपटॉप ५ वर्षांपूर्वी इथे अमेरीकेत घेतला होता.
अरे वा! स्पॉक तात्काळ परत?
अरे वा! स्पॉक तात्काळ परत? वावावा!
(No subject)
मी चेंबूरला के मॉल मधे लॅपटॉप
मी चेंबूरला के मॉल मधे लॅपटॉप दुरुस्त करायला दिला होता. अत्यंत वाईट अनुभव. किती वेळा फेर्या मारायला लावतील याचा नेम नाही, आणि ते सुद्धा कंपनीच्याच सर्व्हीस सेंटर मधेच नेतात. तिथल्या तिथे तर अगदी जुजबी असेल तरच करतात काम.
त्यामूळे वेळ लागणार हे नक्की.
अनेकदा कंपन्या अधिकृत नसलेल्या लोकांनी जर तो उघडला / हाताळला तर वॉरंटी असली तरी ती जबाबदारी घेत नाहीत.
धन्यवाद मंडळी. आईकडून कळलेले
धन्यवाद मंडळी.
आईकडून कळलेले अपडेट - आईच्या लॅपटॉपला वायरस प्रोटेक्शन वगैरे इन्स्टॉल करणार्या माणसाला आईच्या शेजारणीने फोन करुन बोलावून घेतले. त्याने चेक करुन लॅपटॉपचा फॅन बदलायला लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे त्याने दोन दिवसांनी फॅन बदलून दिला. सध्या तरी लॅपटॉप त्रास देत नाहीये.
लॅपटॉप चे हायबरनेशन मोड कसे
लॅपटॉप चे हायबरनेशन मोड कसे बंद करायचे..कल्पना असल्यास मार्गदर्शन करावे