पहिलीचा वर्ग. राष्ट्रगीत संपवून बाई लहानग्याचे ग्रूप पाडताहेत.
शहरातली रात्र. क्लबबाहेर तरुणांची गर्दी. हास्यविनोद रंगलेत. आतून संगीताचे आवाज आणि आपल्याला कधी आत जायला मिळेल आणि कोण भेटेल अशी मनात हुरहुर.
मोठ्ठ्या मैदानात गाण्याचा कार्यक्रम चालू आहे, श्रोतृवृंद एका बहारदार क्षणी टाळ्यांचा कडकडाट करतोय.
वीकांताला समुद्रकिनार्यावर ब्लँकेटवर शांतपणे वाचत बसलोय, मुलं किल्ला करताहेत पाण्यात डुंबताहेत, बार्बेक्यू आणि भुट्ट्याचा वास नाकाला हुळहुळतोय.
ऑफिसातलं हॉलिडेज पॉटलक उरकलं की एअरपोर्टला कारपूल करायचं का असं तो तिला विचारतोय.
माझ्या आईचा लॅपटॉप आजकाल अधून मधून अचानक कर्र असा काहीतरी आवाज करुन बंद होतो. थोड्या वेळाने पुन्हा सुरु केला तर व्यवस्थित चालतो. पण असे वारंवार होत आहे. लॅपटॉपचा वापर स्काइपसाठी होतो. माझ्याशी स्काईप करताना गेल्या आठवड्यात दोनदा असे झाले. तर या वारंवार आजारी पडणार्या लॅपटॉपला काय झाले आहे त्याचे निदान/दुरुस्तीसाठी खात्रीशीर दुकान /सेवा देणारे सुचवाल का? आई वसंतविहार परीसरात रहाते. त्यामुळे त्या भागातील असल्यास जास्त सोईचे होईल मात्र तसा आग्रह नाही.
कोणती गाडी घ्यावी इथे जाऊन आपण गाडी घेण्या संदर्भात चर्चा करतोय. तर गाडी घेतल्या नंतर काय काळजी घ्यावी, देखभाल (servicing) कुठे आणि केव्हा करावी, सुटे भाग कोणत्या कंपनीचे, कुठून आणावेत, फ्री सर्व्हिसिंग झाल्या असतील तर कोणाकडून करून घ्याव्यात, गाडीचा विमा कोणत्या कंपनीकडून करून घ्यावा, ओळखीचे मेकॅनिक... एक ना दोन हजार प्रश्न पडतात. आपल्यालाही असे प्रश्न पडले असतील किंवा या बद्दल काही माहिती असेल तर कृपया इथे लिहा.