ऑलिंपिक स्पर्धा प्रत्यक्ष बघण्याचा माझा अनुभव (पूर्वार्ध)
दर चार वर्षांनी भरणारा खेळाडूंचा 'कुंभमेळा' म्हणजे उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा ह्या वर्षी फ्रान्समधल्या पॅरीसमध्ये आयोजित केल्या गेल्या आणि मला अगदी अनपेक्षितपणे.. म्हणजे फार प्लॅनिंग, ठरवाठरवी न करता तिथे जाऊन ऑलिंपिक गेम्स प्रत्यक्ष बघायची संधी मिळाली. 'प्रत्यक्षापेक्षा प्रतिमा उत्कट' असं म्हणतात त्याच्या अगदी उलट अनुभव आला. म्हणजे प्रतिमेत किंवा टिव्हीवर दिसणारे हे खेळ उत्कट/भारी वगैरे असतातच पण तिथे जाऊन अनुभवता आलेला ऑलिंपि़कचं उत्सवी वातावरण, उत्साह, जोष, अतिशय तीव्र स्पर्धा हे सगळं खरोखरच शब्दांच्या पलिकडचं होतं.