टोकियोचा ‘मिराईतोवा’ सज्ज

Submitted by पराग१२२६३ on 17 July, 2021 - 14:18

नियोजित वेळापत्रकाच्या एक वर्ष पुढे गेलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेचे 23 जुलैला अधिकृतपणे उद्घाटन होत असले तरी त्यातील फुटबॉल आणि सॉफ्टबॉल स्पर्धांना 21 जुलैपासूनच सुरुवात होत आहे. या क्रीडा स्पर्धांसाठी जगभरातील क्रीडारसिकांचे स्वागत करण्यासाठी ‘मिराईतोवा’ आणि ‘सोमेईती’ हे दोघंही टोकियोमध्ये पार पडत असलेल्या उन्हाळी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकचे शुभंकर आता सज्ज झालेले आहेत. पण ‘कोविड-19’च्या महासाथीमुळे यावेळी त्यांना आपल्या सर्वांचे स्वागत आभासी पद्धतीनेच करावे लागणार आहे.

‘मिराईतोवा’ हा शब्द जपानी शब्द ‘मिराई’ म्हणजे भविष्य आणि ‘तोवा’ म्हणजे निरंतरता यांच्यापासून तयार केला गेला आहे. तसेच ‘सोमेईती’ cherry blossom चा एक प्रकार असलेल्या ‘सोमेईयोशिनो’ यावरून घेतला गेला आहे. ‘मिराईतोवा’च्या आरेखनात नव्या-जुन्या संकल्पनांचा समावेश केलेला आहे. ‘मिराईतोवा’ आणि ‘सोमेईती’ आधुनिक डिजिटल युगाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्या दोघांमध्ये एकमेकांविषयीची प्रचंड आदर आणि मैत्री दिसून येते.

या लेखाची लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/07/blog-post_17.html

ऑलिंपिकोत्सव
https://avateebhavatee.blogspot.com/2021/07/blog-post_14.html

Group content visibility: 
Use group defaults