हॉटेल गोवा इन मध्ये प्रचंड शांतता पसरली होती.
एक साधासा वेटर, त्याला एक कुप्रसिद्ध डॉन घाबरून पळून गेला. आणि तो वेटर जस की काही झालच नाही अश्या थाटात निवांत आपल्या नेहमीच्या जागेवर बिअर पीत बसला होता.
जॉर्ज, जेम्स आणि मेरी तिघांच्याही मनात विचारांनी थैमान घातले होते. हा जो कोणी आहे तो नेमका कोण आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही धोका तर नाही ना??
दोन चार दिवस म्हणता म्हणता दोन महिने झाले. विष्णू गोवा इन मध्ये चांगलाच रुळला. आणि जॉर्जलापन त्याच काम आवडलं. विष्णू ने स्वतःहूनच काही बदल केले. जसे की फॅमिली टेबल साठी ठराविक कोपऱ्यात टेबल्स मांडले. काही टेबल्स काढून टाकले. लाईटचे काही फोकस बदलले. जॉर्ज कमालीचा खुश होता विष्णुवर.
सकाळी अकरा वाजेची ड्युटी असूनपन विष्णू दहालाच कामाला सुरुवात करायचा. अकरा वाजेपर्यंत संपूर्ण हॉटेलची साफ सफाई झाली की किचन मध्ये जाऊन कटिंग साठी मदत करायचा. इन मिन पाच माणसे कामाला. त्यातील तीन किचन दोन बाहेर.