बदला : भाग दोन

Submitted by kotwalsk on 26 June, 2021 - 02:35

दोन चार दिवस म्हणता म्हणता दोन महिने झाले. विष्णू गोवा इन मध्ये चांगलाच रुळला. आणि जॉर्जलापन त्याच काम आवडलं. विष्णू ने स्वतःहूनच काही बदल केले. जसे की फॅमिली टेबल साठी ठराविक कोपऱ्यात टेबल्स मांडले. काही टेबल्स काढून टाकले. लाईटचे काही फोकस बदलले. जॉर्ज कमालीचा खुश होता विष्णुवर.
सकाळी अकरा वाजेची ड्युटी असूनपन विष्णू दहालाच कामाला सुरुवात करायचा. अकरा वाजेपर्यंत संपूर्ण हॉटेलची साफ सफाई झाली की किचन मध्ये जाऊन कटिंग साठी मदत करायचा. इन मिन पाच माणसे कामाला. त्यातील तीन किचन दोन बाहेर.
बाहेर मात्र विष्णू गिऱ्हाईकला काही कमी पडू देत नसे. सर्विसच अशी असायची की गिऱ्हाईक खुश होऊन जायचे. टेस्ट चा विषयच नव्हता. टेस्टसाठी कूक जीवच रान कराचा. आणि त्यामुळेच गिऱ्हाईकांचा ओघ हळू हळू वाढत होता. एकंदरीत जॉर्जचा विष्णू ला कामाला ठेवण्याचा निर्णय योग्य ठरला होता.
जॉर्जचे फक्त हॉटेलचं होते असे काही नाही. त्याचे चार फ्लॅट्स पण होते. सीझन मध्ये ते भाड्याने देऊन त्याची चांगली कमाई व्हायची. जॉर्ज बावन्न वयाचा गृहस्थ. बायको खूप आधी देवाघरी गेली. दोन मुले म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी मागे ठेऊन. मुलगी चोवीस तर मुलगा वीस. मुलगी मेरी दिल्लीला शिकायला तर मुलगा जेम्स मात्र थोडासा हातातून गेलेला. बापाचे पैसे घेणे आणि बाहेर जाऊन उडवणे बस एव्हढच माहीत. हॉटेल मधल्या कामगारांना देखील तो काहींच्या काही बोलायचा. त्यातून विष्णू सुद्धा सुटला नव्हता. पण सगळे जॉर्जच्या चांगल्या स्वभावामुळे गप्प बसायचे.
विष्णूच्या कामावर खुश होऊन जॉर्जने त्याला पहिल्याच महिन्यात सहा हजार पगार देऊ केला. पण विष्णू ने नम्र पणे नकार देऊन पाच हजारच घेतले.
सर्व काही व्यवस्थित चालू होते. जॉर्ज च हॉटेल त्याची कमाई , विष्णूचे काम सर्व काही एकदम व्यवस्थित.
पण म्हणतात ना जेव्हा सगळं काही व्यवस्थित चालू असते तेव्हा समजायचं की काहीतरी गडबड होणार आहे.

क्रमशः
----------------------------------------------------------------

हा भाग छोटा झाला आहे त्याबद्दल माफी असावी. कारण पुढे वाढवला असता तर खूपच मोठा भाग झाला असता. आणि माझ्या वैयक्तिक कामामुळे तेव्हढा वेळ भेटत नाही. पण पुढील भाग लवकरच टाकेल. आणि त्यामध्ये ट्विस्ट पण आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

पण मग फुरसतीने मोठा भागचं टाकायचा ना!
पुढील भाग मोठा असावा ही विनंती !!