हॉटेल गोवा इन मध्ये प्रचंड शांतता पसरली होती.
एक साधासा वेटर, त्याला एक कुप्रसिद्ध डॉन घाबरून पळून गेला. आणि तो वेटर जस की काही झालच नाही अश्या थाटात निवांत आपल्या नेहमीच्या जागेवर बिअर पीत बसला होता.
जॉर्ज, जेम्स आणि मेरी तिघांच्याही मनात विचारांनी थैमान घातले होते. हा जो कोणी आहे तो नेमका कोण आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही धोका तर नाही ना??
शांततेचा भंग करत शेवटी जॉर्ज बोलला.
" मला असे वाटते की आज रात्री आपण विष्णूला जेवायला बोलवावे. आणि त्यालाच विचारावे की तू नेमका कोण आहेस, कुठून आला आहेस, मायकल सारखा गुंड माणूस तुला कसकाय घाबरतो. आमच्या या छोटाश्या कुटुंबाला तुझ्यामुळे काही प्रॉब्लेम तर नाही ना.पण मेरी हेपन आपल्याला विसरून चालणार नाही की त्याच्याचमुळे आज आपला जेम्स जिवंत आहे. त्याचे हे एक उपकारच आहेत आपल्यावर. यावर तुझं काय मत आहे मेरी??"
मेरी" तुम्ही बोलताय ते खरंय पप्पा. मी सहमत आहे तुमच्याशी. बोलवा त्याला जेवायला. मी बोलेल त्याच्याशी."
जेम्स ने पण सहमती दिली.
आणि विष्णू मात्र निवांत बिअर पित होता. त्याच वेळी त्याचा मोबाइल वाजला. मोबाईलवरील नंबर पाहून मात्र विष्णू गंभीर झाला. आणि कॉल उचलला.
-----------––---------------------------------------------------
मेजर स्वामी विचारात पडले होते. नेमकं करावं काय. गुरुशी कॉन्टॅक्ट पूर्ण देशात फक्त तेच करू शकत होते. पण गुरू सध्या खूप मजेत होता. पण प्रश्न देशाचा होता. आणि इरफान तोपन तर होता. गुरूचा नंबर एकचा दुश्मन. शेवटी त्यांनी गुरूला कॉल केलाच.
फोन वाजताच आणि त्यावरील नंबर पाहताच गुरूच्या डोक्यावर अढ्या पडल्या. कारण पण तसेच होते. मेजरचा आणि त्याचा कॉल व्हायचा तोच मुळी फक्त दर रविवारी. आणि आज तर बुधवार आहे. नक्कीच काहीतरी प्रोब्लेम आहे. असा विचार करतच गुरूने फोन रिसिव्ह केला.
गुरू-" हाय पप्पा कसे आहात. आज कासकाय फोन केलात. काही प्रॉब्लेम आहे का?"
मेजर जरी गुरुचे वडील नसले तरी गुरू त्यांना पप्पाच म्हणायचा. कारण हे जे आयुष्य होत ते मेजर नि त्याला दिल होत. तेच त्याचे मायबाप होते. नाहीतर गुरू कुठंतरी छोटी मोठी काम करत असला असता.
मेजर-" हो प्रॉब्लेम आहे, आणि खूप मोठा प्रॉब्लेम आहे, इरफान जिवंत आहे, तुझ्याकडून चूक झाली बेटा तो जिवंत आहे. आणि सध्या भारतात आहे. काहीतरी खूप मोठं घडवण्यासाठी. मला ATT कडून फोन आला होता. त्यांना तूझी गरज आहे बेटा. पण काय करायचं ते तूझ तू ठरव बेटा, तुझ आयुष्य सध्या खूप मजेत चालुये. तुला परत ATT मध्ये यायचं की आहे तसच तुझं आयुष्य तुला मजेत जगायचंय हे तुझं तूच ठरव."
गुरू-" यात ठरवायचं काय आहे पप्पा. तो जिवंत आहे. आणि मी मजेत जगू का?? कसकाय मी मजेत जगू शकतो पप्पा. त्याला संपवण्याशिवाय मी मजेत नाही जगू शकत पप्पा"
मेजर-" शाब्बास बेटा, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मला ATT कडून पांडे नावाच्या ऑफिसरचा फोन आला होता, मी त्याचा नंबर तुला सेंड करतो. तू त्याच्याशी बोलून घे. जय हिंद."
गुरू-"जय हिंद"
कॉल कट झाला आणि गुरूला पांडेचा नंबर भेटला. त्याने लगेच पांडेचा नंबर डायल केला,
गुरू-" हाय, गुरू बोलतोय"
पांडे-" हाय सर, माफ करा सर, पण मला एक सांगा भारतात ताजमहाल पेक्षा उंच काय आहे?"
हा एक कोड होता. प्रत्येक एजेंट साठी तो वेगवेगळा होता. पांडेला पूर्ण खात्री होती की हा कॉल गुरूंचाच आहे तरी त्याने कोड विचारला.
गुरू थोडं हसून-" कुतुब मिनार ताजमहाल पेक्षा उंच आहे पांडे. बोला मी गुरुच बोलतोय"
खात्री झाल्यावर पांडे बोलला" सर आमच्याकडे इन्फॉर्मेशन आहे की इरफान भारतात आलाय तसा त्याचा फोटो आणि एक कोडेड मेल आम्हाला भेटलीये. मेल पूर्ण डिकोड आम्हाला करता आली नाहीये. पण एव्हढं समजलंय की अजून ५१ दिवसांनी काहीतरी भयंकर घडणार आहे."
गुरू-"ओके पांडे एक काम करा ते दोन्ही मला मेल करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी किट मला उद्या सकाळपर्यंत हवी आहे. होऊ शकते का हे."
पांडे-"नक्कीच सर, मला तुम्ही तुमच लोकेशन सेंड करा. मी स्वतः तुमची किट घेऊन येतो. आणि ते दोन्ही मेल लगेच करतो तुम्हाला."
गुरू-"गुड, जय हिंद"
पांडे-"जय हिंद सर"
लोकेशन सेंड करून गुरू पांडेच्या मेलची वाट पाहू लागला. मोबाईलवरच त्याने ATT चा सीक्रेट मेल आयडी ओपन केला. तिसऱ्याच मिनिटाला त्याला मेल भेटली.
मेल मध्ये इरफानचा फोटो आणि ती कोडेड मेल होती. इरफानला पाहताच गुरुची तळ पायाची आग मस्तकात गेली. आपल्या शाहिद साथीदारांचे चेहरे डोळ्यासमोर येऊ लागले. मात्र एका क्षणात गुरूने स्वतःवर नियंत्रण आणले आणि तो ती कोडेड मेल पाहू लागला. गुरू सात महिने इरफानसोबत वेष पालटून राहिला होता. त्याची प्रत्येक छोटी छोटी माहिती गुरूला माहीत होती, त्याच जेवण खाण ते काम करायची पद्धत सर्व काही.
मेल पाहता पाहता काही शब्द त्याच्या डोक्यात फिट्ट बसले
51 TSA KMD, NI AG. या शब्दांवर त्याला थोडा संशय आला. आपल्या गोल्ड फ्लॅक light चे कश घेता घेता तो विचार करू लागला आणि त्याच्या डोक्यात काही चमकले. त्याने ते शब्द उलट केले.
15 AST DMK, IN GA.
म्हणजे 15 august dhamaka in goa. येस गोव्यात धमाका. गुरूला आठवले गोव्याचे एक स्वातंत्र्य सेनानी नुकतेच वृद्धापकाळानी मृत पावलेत. आणि त्याच मुळे प्रधानमत्र्यांनी यावर्षीचा स्वातंत्र्य सोहळा दिल्ली ऐवजी गोव्यात होणार असल्याचे जाहीर केलं होतं. म्हणजे याच सोहळ्यात धमाका होणार आहे.
गुरूने पटपट निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्याला काही मेल्स आणि फोन कॉल्स करून रेड अलर्टची माहिती द्यायची होती. आणि त्याच वेळी त्याची नजर इरफानच्या फोटोवर गेली.
इरफान खूप चलाख होता. इतक्या सहजा सहजी कसकाय त्याने आपला फोटो ATT कडे येऊ दिला. त्यातच त्याच्या ओठाच्या एक कोपऱ्यातील ती गूढ स्माईल. म्हणजे म्हणजे एकच की आपला फोटो पाहून नक्कीच ATT गुरूला कॉन्टॅक्ट करील. आणि गुरू आपल्यामुळे नक्कीच मैदानात उतरेल.
गुरूच्या चेहऱ्यावर एक किलर स्माईल उमटली.
'होय इरफान. मी मैदानात आलोय. आणि यावेळी तुला सोडणार नाही. I m back irfan"
गुरूने कॅलेंडर पाहिलं आज 2 ऑगस्ट म्हणजे अजून तेरा दिवस बाकी होते धमाक्यासाठी.......
------------------------------------------------------------------
पांडे ने सर्व ऑफिसर्स ला मेल आणि फोन करून सांगितलं की गुरू परत येतोय. आणि तो गुरुची किट घेऊन जातोय गुरूला भेटायला. पांडेंनी स्टाफ चेंबर ओपन केलं आणि तो 412b या लॉकर समोर उभा राहिला. त्याने ते लॉकर उघडलं आणि आतून ती काळी सुटकेस बाहेर काढली. त्यावर डिजिटल लॉक होते. 412b हे गुरुचे लॉकर होते. सुटकेसचा लॉक फक्त गुरूलाच माहीत होते. आणि पांडेला ती सुटकेस घेऊन गुरूने दिलेल्या लोकेशन ला निघायचे होते. लोकेशन होते गोवा..........
----------------------------------------------------------------
चार दिवस झाले इरफान फोनची वाट पाहत होता. त्याला अपेक्षित तो फोन इतक्यात यायला हवा होता. त्याच वेळी फोन वाजला. त्याने फोन उचलला.
" मुबारक हो इरफान मियाँ. आपल्या प्लॅनचा पहिला पडाव यशस्वी झालाय. गुरू मैदानात उतरलाय.
इरफान-"अरे वा, याचीच तर वाट पाहत होतो. त्याला आता उड्या मारू दे. तो थकला की मग आपण आपला पुढचा डाव टाकू, खुदा हाफिज"
फोन ठेऊन इरफान स्वतःशीच
"वेलकम गुरू. तुझीच वाट पाहत होतो. असाही अजून तेरा दिवस मला काही काम नाहीये. आणि यावेळी मी तुला सोडणार नाही. तुझा मृत्यू माझ्याच हातून होणार आहे"
आणि तो हसू लागला. गडगडाटी हास्य होते ते. कुणीही पाहून त्याला घाबरला असता अस ते हास्य होत.
------------------------------------------------------------------
क्रमशः
छान सुरु आहे
छान सुरु आहे
पुढील भाग लवकर येऊ द्यात.
छान सुरू आहे पण भयंकर शुले
छान सुरू आहे पण भयंकर शुले च्या चुका आहेत. अगदी शीर्षकात सुद्धा बदला ऐवजी बदल झालंय. वाचताना त्रास होतोय.
मी आतुरतेने बदलाच्या सर्व भागांची वाट पाहतेय त्यामुळे आल्या आल्या वाचली.
छान !
छान !
छान चालू आहे पण लवकर भाग टाकत
छान चालू आहे पण लवकर भाग टाकत जा।।।