शोक

परिमाण

Submitted by आर्त on 22 May, 2021 - 11:14

काळीज माझे फक्त का? हा प्राण तू घेऊन जा,
हे प्रेम म्हणजे काय ते परिमाण तू घेऊन जा.

आयुष्य सारे शाप मी खाऊन अंगी काढले,
'करणार नाही कौतुके', ही आण तू घेऊन जा.

झाले पुरे मज रेटणे, हे एकदाचे संपवू,
ही आणलेली प्रेरणा अन त्राण तू घेऊन जा.

होती अगोदर जीवनी शांती किती, सांगू तुला,
जी भावनांची खोदली ती खाण तू घेऊन जा.

आहे म्हणाली प्रेम पण तू प्रेम ना केले कधी,
खोटेच शब्दांचे तुझे हे बाण तू घेऊन जा.

मज शोक करण्या पाहिजे अंधार आणिक आसवे,
या चांदण्यांची नाटकी ही घाण तू घेऊन जा.

विषय: 
Subscribe to RSS - शोक