Submitted by आर्त on 22 May, 2021 - 11:14
काळीज माझे फक्त का? हा प्राण तू घेऊन जा,
हे प्रेम म्हणजे काय ते परिमाण तू घेऊन जा.
आयुष्य सारे शाप मी खाऊन अंगी काढले,
'करणार नाही कौतुके', ही आण तू घेऊन जा.
झाले पुरे मज रेटणे, हे एकदाचे संपवू,
ही आणलेली प्रेरणा अन त्राण तू घेऊन जा.
होती अगोदर जीवनी शांती किती, सांगू तुला,
जी भावनांची खोदली ती खाण तू घेऊन जा.
आहे म्हणाली प्रेम पण तू प्रेम ना केले कधी,
खोटेच शब्दांचे तुझे हे बाण तू घेऊन जा.
मज शोक करण्या पाहिजे अंधार आणिक आसवे,
या चांदण्यांची नाटकी ही घाण तू घेऊन जा.
मजला दिल्या तू लाख या काळोख भरलेल्या निशा,
उजळेन मी केव्हातरी ही जाण तू घेऊन जा.
आर्त
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाटकी चांदण्यांची घाण - वा
नाटकी चांदण्यांची घाण - वा
===
गं असा उच्चार / शब्द गुरू शब्द म्हणून शक्यतो घेऊ नये
===
तीन ठिकाणी 'स' या अक्षराचा अभाव खटकला. (खोदली, केले, दिल्या). अर्थात, तो 'स' घेण्यासाठी शब्दरचना किंवा वृत्तसुध्दा कदाचित बदलावे लागेल.
जमीन छान आहे. परिमाण घेऊन जा यात घेऊन ऐवजी समजून हवे होते असे वाटत राहिले
शुभेच्छा
@बेफ़िकीर प्रतिसाद वाचून छान
@बेफ़िकीर प्रतिसाद वाचून छान वाटलं. मुद्दे पटले.
आणि हो, 'परिमाण समजून जा' असं घेतलं असतं तर पुढे जास्त सोपं झालं असतं. मन थोडं 'रदीफ़' प्रेमी असल्यामुळे असा विचार डोक्यात आला नाही. पुढील लिखाणात हे सर्व ध्यानी ठेवेन.
एक प्रश्न: गं च्या ऐवजी 'अगं' असं घेतलं तर मग तो दीर्घ घेता येईल ना?
===
तुमच्या दादीसाठी आणि सकारात्मक सूचनांसाठी धन्यवाद.
सध्या सोपा उपाय म्हणून गं, अग
सध्या सोपा उपाय म्हणून गं, अग ऐवजी 'हे' घेता येईल
पुढील चर्चा, म्हणजे भरीचा हे वगैरे नंतर करू
@बेफिकीर: धन्यवाद. बदल केलेला
@बेफिकीर: धन्यवाद. बदल केलेला आहे.
भरीचा काय हे काही कळलं नाही. मी शोधली पण आहि माहिती सापडली नाही.
>>>>मजला दिल्या तू लाख या
>>>>मजला दिल्या तू लाख या काळोख भरलेल्या निशा,
उजळेन मी केव्हातरी ही जाण तू घेऊन जा.
फार सुंदर आहे त या शेवटच्या ओळी.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो