प्रीतीचा वेल
Submitted by आरती शिवकुमार on 17 May, 2021 - 15:49
झाडाने दिली वेलीला संगत,
सुरू झाली त्यांच्या प्रेमाची रंगत.
एकमेकांना दिला त्यांनी प्रीतीचा दोर ,
बदलला त्यांच्या जीवनाचा मोड.
सर्वत्र पसरला त्यांच्या प्रीतीचा सुगंध ,
एकमेका सोबत ते होऊन गेले दंग.
दिली त्यांनी एकमेकांना साथ ,
अनेक वादळा वर केले त्यांनी मात .
झाडाने घातला वेलीला मोत्याचा हार,
वेलीला बहरला फुलाचा बहार.
वेलीला लागली सुगंधित फुले ,
झाडाला आली खूप सारी फळे.
झाडांनी दिली पक्षांना संगत ,
बसू लागली पाखरांची पंगत .
आली तेथे फुलपाखरे,
सगळ्यांना दिले त्यांनी आश्रय.
प्रांत/गाव:
शब्दखुणा: