Submitted by आरती शिवकुमार on 17 May, 2021 - 15:49
झाडाने दिली वेलीला संगत,
सुरू झाली त्यांच्या प्रेमाची रंगत.
एकमेकांना दिला त्यांनी प्रीतीचा दोर ,
बदलला त्यांच्या जीवनाचा मोड.
सर्वत्र पसरला त्यांच्या प्रीतीचा सुगंध ,
एकमेका सोबत ते होऊन गेले दंग.
दिली त्यांनी एकमेकांना साथ ,
अनेक वादळा वर केले त्यांनी मात .
झाडाने घातला वेलीला मोत्याचा हार,
वेलीला बहरला फुलाचा बहार.
वेलीला लागली सुगंधित फुले ,
झाडाला आली खूप सारी फळे.
झाडांनी दिली पक्षांना संगत ,
बसू लागली पाखरांची पंगत .
आली तेथे फुलपाखरे,
सगळ्यांना दिले त्यांनी आश्रय.
त्यांची माया अशीच वाहू दे ,
त्यांची छाया सर्वत्र राहू दे.
- आरती शिवकुमार
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
चांगले विवाहित जीवन कसे जगावे
चांगले विवाहित जीवन कसे जगावे याबद्दल ही कविता शिकवते. सुंदर कविता.
धन्यवाद.
धन्यवाद.
सुंदर!!
सुंदर!!
खूप धन्यवाद.
खूप धन्यवाद.
छान कविता... अगदी गोड..!!
छान कविता... अगदी गोड..!!
खूप धन्यवाद रुपाली.
खूप धन्यवाद रुपाली.
Heart touching poem!! Khupach
Heart touching poem!! Khupach mast..