America is built on the backs of the immigrants. Immigrants have become part of the American society. हे चक्र पिढ्यान पिढ्या सुरु आहे. अमेरिका भांडवलशाही देशसुद्धा आहे. अमेरिका ही मुक्त बाजारपेठ सुद्धा आहे, अमेरिकेमध्ये व्यक्ती-स्वातंत्र्याला ही खूप महत्व आहे आणि अमेरिका जगाचा मेल्टिंग पॉट देखील आहे. इतक्या सगळ्या विरोधाभासामधून अमेरिकेची सामाजिक तसेच कोर्पोरेट व्यवस्था निर्माण झाली आहे.
ग्रीन कार्ड हि अडथळ्यांची शर्यंत आहे हे आत्तापर्यंत लक्षात आलेच असेल. ह्यात तुम्ही एकटेच असता तोपर्यंत ठीक आहे, पण काळ थांबत नाही. लग्न, मुले होतात, संसाराचा पसारा वाढत जातो, अनुभव वाढत जातो, तुम्ही जीवनशैलीत स्थिरावत जाता, परंतू ह्या सगळ्याचाच आधार, तुमच्या अमेरिकेतील वास्तव्याचा आधार काही बदलत नाही, मग मर्यादांची जाणीव होते. "अरे, आधीच वेळेत काही निर्णय घेतले असते; कॅनडाला गेलो असतो किंवा दुसऱ्या देशात शिक्षण/नौकरीसाठी गेलो असतो तर बरं झालं असतं" वगैरे विचारचक्र सुरु होतात. उद्योग किंवा इतर काही योजना अनुभवातून तयार झालेल्या असतात, पण संधींचा लाभ घेता येत नाही.
आपण चौथ्या प्रकरणात बघितले की अमेरिकेच्या स्थलांतरण धोरणात विविध देशातून येणाऱ्या "लोंढ्यांवर" नियंत्रण ठेवण्याचा प्रत्येक काळात प्रयत्न केला गेला आहे. त्या त्या काळातील सामाजिक स्थिती, मूल्यांचे प्रतिबिंब स्थलांतरणाच्या धोरणात पडले आहे. दुसऱ्या प्रकरणात आपण बघितले, अमेरिकेच्या तीरावर आल्यावर, इथल्या समाजाने (सरकार दरबारी) सहजासहजी स्वीकारले नाही, त्यांना स्वतःला सिद्ध करावेच लागले. सद्य काळातील ग्रीन कार्ड सिस्टिममध्ये देखील त्याचे प्रतिबिंब पडले आहे.
तसं बघायला गेलं तर कायदेशीर मार्गाने अमेरिकेत येण्यासाठी १८५ प्रकारचे विविध व्हिसा आहेत. परंतू त्यातील भारतीयांसाठी फारच कमी उपलब्ध आहेत. अमेरिकेचे जगाबरोबर व्यापार संबंध जसजसे विस्तारत गेले तसे विविध प्रकारचे व्हिसा अस्तित्वात आले, उदा. इ-३ व्हिसा; हा व्हिसा फक्त ऑस्ट्रेलियन नागरिकांसाठी आहे.
आधी म्हटल्याप्रमाणे कोलंबसाने अमेरिका शोधल्यापासून अमेरिकेत अव्याहतपणे स्थलांतर सुरूच आहे. जस जशी वस्ती वाढायला लागली तसतश्या ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश.... विविध कॉलन्या तयार झाल्या, त्यांचे त्यांच्या देशांशी व्यवहार सुरूच होते, त्या त्या देशातील कायदे पद्धती तिथे राबवली जात होतीच, सर्वप्रथम ब्रिटिश कॉलन्यांमध्ये १७४० साली पहिला, प्लांटेशन ऍक्ट लागू झाला. नागरिकत्वाशी संबंधित ज्ञात असलेल्या कायद्यांपैकी पहिला कायदा. १७४० म्हणजे अमेरिकेला स्वातंत्र्य मिळायच्या आधी ३६ वर्ष हा कायदा लागू झाला होता.
भारत आणि अमेरिका हे देश खरं तर पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला आहेत. कधी कधी असं मजेत म्हटले जाते की भारताच्या बाजूने खोदायला सुरुवात केली तर दुसऱ्या बाजूने अमेरिकेत बाहेर पडू. भारताचा थेट संबंध आला तो मध्य-पूर्वेतील किंवा युरोपिअन देशांबरोबर. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शीतयुद्ध कालावधीत भारताचा कल रशियाकडेच राहिला, त्यामुळे भारतीयांचे अमेरिकन आकर्षण वाढायचे तसे काही ठोस-सबळ कारण दिसत नाही, तरी सुद्धा भारतीयांचे २०व्या शतकात अमेरिकेत स्थलांतर होतंच राहिले आणि ते आजतागायत सुरु आहे.
जगमान्य सिद्धांताप्रमाणे, १४९२ साली कोलंबसाने "नवीन जगाचा" शोध लावल्यापासून "नव्या जगाकडे" स्थलांतरितांचा ओघ गेली ५०० वर्षे अव्याहतपणे सुरु आहे, आणि या पुढेही तो सुरूच राहील.
परंतू कोलंबसाच्या "शोधाला" छेद देणारे नव-नवीन प्रस्ताव सतत मांडले जातात.
जसे,
१) दहा - पंधरा हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी कमी असल्याने आशिया खंडातून अलास्कामार्गे प्रथम स्थलांतर झाले, तीच संस्कृती पुढे "मूळ-निवासी" (नेटिव्ह - इंडियन) विस्तारली आणि त्यांची कोलंबसाची भेट झाली.
जर तुम्ही आधीचे लेख न वाचताच ह्या लेखावर आला असाल, तर काही गैरसमज होऊ नये आणि विषयाची/ समस्येची व्याप्ती समजावी म्हणून प्रस्तावनेपासून सुरुवात करावी हि विनंती.
प्रस्तावना: https://www.maayboli.com/node/76257
_________________________________________________________________________
नमस्कार,
सर्वप्रथम एवढे मोठे शीर्षक वाचून देखील तुम्हाला पुढे वाचावेसे वाटले ह्या करता सर्वांचे मन:पुर्वक आभार.
अमेरिकेविषयी मराठी तसेच भारतीय वाङ्मय विश्वातील सर्व लेखन प्रकारात, जसे लेख, ललीत, कादंबऱ्या, लघुकथा, क्रिया-प्रतिक्रिया, उखाळ्या पाखाळ्या, वगैरे वगैरे तसेच अमेरिकेतील चांगल्या - वाईट आणि इतर सर्व गोष्टींचा खिस पाडून झाला आहे. तरी मी ह्या लेखमालेतून असे वेगळे काय सांगणार आहे?