फुलांच्या रांगोळ्या
सध्या बागेत खूप फुले येत आहेत. विविध फुलांची सजावट करून त्याची रांगोळी फार सुंदर दिसते. या लेखनाच्या धाग्यावर काही रचनांचे फोटो देत आहे.
------------
------------
----------
सध्या बागेत खूप फुले येत आहेत. विविध फुलांची सजावट करून त्याची रांगोळी फार सुंदर दिसते. या लेखनाच्या धाग्यावर काही रचनांचे फोटो देत आहे.
------------
------------
----------
माझा फुलांच्या रांगोळ्यांमधला सगळ्यात अवडता प्रकार.
फुलांची सप्तपदी
============================
हम्म्म्म्म...पण हा प्रकार एकंदर सगळ्याच बाबतीत खर्चीक...बरं का! वेळ/पैसा/फुलांची बाजारहाट-ने आण/आणि आमच्या मंगल-कार्यालयातनं यासाठी मिळवून घ्यायचं सहकार्य! या सगळ्याला खर्चीक..हाच टॅग लावावा लागेल. कारण,ही सप्तपदी माझ्याकडनं करवून घेणारा माझा एखादा यजमान असो! (हल्ली क्लायंट म्हणातात ना हो त्यांना!? ) किंवा त्या'खेरीज फक्त सप्तपदी काढण्याची आलेली ऑर्डर असो. घाम काढल्याशिवाय होणारं ,हे काम नाही!
तुंम्ही म्हणाल..काय काय ..असं होतं तरी काय?
नमस्कार... मायबोलीकर...
आज मी आपल्या समोर, मी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्यांची काही छायाचित्र प्रदर्शित करत आहे.ह्या सर्व रांगोळ्या मी माझ्या कामाच्या ठिकाणी काढलेल्या आहेत. (मी पौरोहित्य करणारा आहे. म्हणजे भटजी...!)