मला विलगीकरण नकोय
Submitted by मंगलाताई on 12 April, 2020 - 01:36
शासणाकडून एवढ्या सुट्टया मिळाल्यात. कधी नव्हे ते आम्हाला घरी बसायला मिळालं.आता कळलं की बसणं आणि चालत रहाणं, काम करत रहाणं यात किती फरक आहे .मला सुट्टी मिळत नाही असे मी मनातल्या मनात कितीदा तरी म्हणत होते . मला सुटट्या मिळाल्या , घरातल्या सगळ्यांना च सुटट्या मिळाल्या. शाळेतली मुलं दिसत नाहीत, हातांना काम नाही, परीक्षा नाही, मुलांचा गोंगाट नाही, रागवायला मुलं नाहीत, शाबासकी द्यायला कुणीही नाही. हे सर्व नाही नाही किती नकारात्मक आह. हा एकटेपणा, एकांत किती करंटा आहे. मुलं आहेत म्हणून शाळा आहे, शाळा आहे म्हणून नोकरी आहे, नोकरी आहे म्हणून शिकवणं आहे, शिकवणं आहे म्हणून मला व्यक्त होता येत.
शब्दखुणा: