#मोतीमाळ

मोतीमाळ

Submitted by salgaonkar.anup on 4 February, 2020 - 22:45

मोतीमाळ
उमलत्या नव्या क्षणांना
आहे आधार भावनेचा
बांधली ही मोतीमाळ
जी सांधणारा हात तुझा

एक मोती लाख सुखाचा
एक अतीव दुःखाचा
धागा धागा जोडू पाहतो
एक बंध प्रेमळ मनाचा

सगळे तुझ्याच आवडीचे मोती
कसे एकसंग नांदत राहती
तुझ्या स्पर्शाच्या रंगात
दुधाळी शुभ्र रंगून जाती

स्वतंत्र आहे प्रत्येक मोती
आपुलकी ही जपू पाहती
हेवे-दावे, रुसवे फुगवे
ज्यांना स्पर्धा माहितच नाही

तुझ्या नजरेची जादू होते
माळ ही चमकत राहते
वेधून घेते सगळ्या नजरा
घायाळ मनाचा ठाव घेते

Subscribe to RSS - #मोतीमाळ