Athavanitle kahi
शेवटच्या वर्षाची परीक्षा द्यावी का?
परीक्षा पद्धती योग्य का अयोग्य हा विचार सर्वप्रथम मनात आला, परंतु विषय परीक्षा घ्यावी का न घ्यावी असा आहे. Show must go on, जिंदगी कभी रुकती नही. काय होईल? अभ्यासक्रम पूर्ण अभ्यास केला गेला नाहीये तो नीट शिकवता आला नाहीये अगदी बरोबर, पण मी त्या मुलांच्या दृष्टिकोनातून विचार करते. काहीही चूक नसताना त्यांचे एखादे वर्ष वाया जात आहे. सहा वेगवेगळ्या प्रकारचे पेपर तयार करून, सोमवार ते शनिवार एकच विषय पण सोशल डिस्टंसिंग ठेवून मुलांचे गट केले तर परीक्षा देणे शक्य आहे. आता सध्याच्या परिस्थितीचा विचार करून, मुलांना किती आणि कसा अभ्यासक्रम शिकवला गेला असेल हा विचार करून पेपर सेट करता येतील.
चंद्र नसता तर
चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला असा एकुलता एक उपग्रह जो रात्री आपला वाटतो त्याचा शीतल प्रकाश आणि ते चांदणं याचं साहित्य विभागांशी एक वेगळंच नातं दोन प्रेमी जीवांना तो एकमेकांना जोडणारा दुवा वाटतो. सौंदर्याचे उपमा ही चंद्राची व्यक्त पूर्ण होऊ शकत नाही .कधी बहिणीला तो भाऊ वाटतं. भाऊबीजेला जीला भाऊ नाही तिने चंद्राला ओवाळावे अशी प्रथा प्रचलित आहे आणि लहान मुलांचा तो मामा असतो. करवा चौथ,ईद, आणि हिंदू बरेच सण पोर्णिमेला आहेत. हे सगळे सण चंद्राच्या कलेशी संबंधित आहेत.
उगीचच
उगीचच अबला काहीवेळा वाचनात आलेले लेखन बहुतांश घरगुती स्वरूपाचे काही लेख अगदी भरपूर लाईक मिळवून जातात. अगदी वाचताना असं वाटेल की हो या लेखनातली स्त्री मीच आहे आणि ते शेअर होतात. पण खरोखरच तेवढे दुःख त्या स्त्रीला असते का उगाचच दहा जणींना घरांमध्ये खूप त्रास होतो म्हणून मग मीही तशीच मलाही बऱ्याच गोष्टीत कॉम्प्रमाईज करावंच लागतं असा काही देखावा निर्माण केला जातो. किंवा त्या लेखनाचा प्रभाव म्हणून तसं वाटायला लागतं .खरोखरच विचार करायला लावण्यासारखं गोष्ट आहे. दोन व्यक्ती म्हटल्या की काही ना काही त्यात मतभेद हे असणारच.पण ते मतभेद सासरचे वेगळे आणि माहेरचे वेगळे असतात.
मनाचा पोटमाळा
वस्तूनाही असं मन
वस्तूनाही असं मन
सुंदर अक्षर
आज अक्षर दिनाच्या, सुंदर हस्ताक्षर असणाऱ्या सर्वांना शुभेच्छा. एक शब्द दहा वेळा लिहून गिरवून घेऊन चांगलं वळण देणाऱ्या शिक्षकांना तसेच सुलेखा पाटी ज्यांनी वापरली आहे, त्यांना त्याचं महत्त्व आहेच त्याच्या निर्मात्याला, आणि मैत्रिणीच अक्षर सुंदर आहे म्हणून जीव लावून मेहनत घेणाऱ्या त्या निरागस बालमनाला, आणि थोडेसे प्रयत्न करूनही अक्षर चांगलं होत नाही म्हणून नाद सोडून देणाऱ्या मित्र-मैत्रिणींनाही अक्षर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
लांब केस कापायचे?
