सद्य परिस्थिती आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन

Submitted by Athavanitle kahi on 22 September, 2020 - 01:28

सद्य परिस्थिती आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन

जग झाले इथे थांबले वाटते असे झाले आणि सुरुवातीला आठ-पंधरा दिवस वाटले होते ते वाढत वाढत सहा महिने होत आले. तरीही ही महामारी समूळ नष्ट होण्याचे चिन्ह दिसेना, किती काळ घरात बसणार म्हणत हळूहळू आधी हातावरचे पोट असणारे त्यानंतर व्यापारी वर्ग, कर्मचारीवर्ग सगळेच घराबाहेर पडू लागत आहेत याचे प्रमुख कारण बंद किंवा कमी झालेली आर्थिक आवक. सुरवातीच्या काळामध्ये एटीएम ला सुद्धा जाऊ नका, भाजी किराणा इत्यादी गोष्टीही घरात आहेत तेवढ्या मध्ये भागवू, अगदी अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडू म्हणणारी विचारसरणी आता बदलत चालली आहे. व्हायचं असेल तर कुठेही होईल, असं किती दिवस घाबरत बसणार अशाप्रकारे संकटाचा सामना करण्याची मानसिकता तयार झाली. शाळा क्लासेस मात्र अजून बंदच आहेत करण लहान मुलांची काळजी ही आपल्यापेक्षा आपण जास्त घेत असतो. आर्थिक आवक कमी झाली, ती न झेपणारे म्हणून काही व्यावसायिकानी आपले व्यवसाय बदलून ते अत्यावश्यक सेवा व्यवसायाकडे वळले. रिक्षा चालक मजूर वर्ग, ड्रायव्हर,भाजी दूध विकू लागले. कर्मचाऱ्यांचाही वेतनामध्ये काही टक्के कमी केले गेले. मग आता आर्थिक नियोजनाची गरज भासू लागली आहे. सॅनिटायझर, माक प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदिक औषधे, इमर्जन्सी मेडिसिन, अशा गोष्टींची खरेदी वाढली. सतत घरामध्ये असल्यामुळे, कामाची विभागणी, आर्थिक अडचण, या सगळ्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. या सगळ्याच मूळ आर्थिक अडचणीकडे आहे, घरातील कर्त्या पुरुषांना आणि स्त्रियांना हे करोनाचे आजारपण आले, तर आपल्या कुटुंबासाठी काही तजवीज करून ठेवली पाहिजे याची प्रकर्षाने जाणीव झाली, आणि त्यामुळे त्यांचा घर खर्चा वरचा हात आखडता झाला. यासाठी कुटुंबातील व्यक्तींचे मेडिक्लेम असावे काही आजारपण उद्भवले तर किमान खर्चसाठी तरी तजवीज असावी. गरीब-श्रीमंत मध्यमवर्ग सगळ्याच स्तरांमध्ये एकंदरीतच आर्थिक नियोजन जास्त महत्त्वाचे आहे. सगळ्यात आधी आपले उत्पन्न किती आहे आणि आपला आवश्यक खर्च किती आहे याचा विचार केला गेला पाहिजे. त्याबरोबरच येणारे आजारपण, किती काळ आपले उत्पन्न कमी किंवा बंद राहणार आहे याचं फॉर कास्टिंग, या सगळ्याचा मेळ गरजेचा आहे. एका महान व्यक्तीने म्हटले आहे त्याप्रमाणे हे वर्ष फक्त जिवंत राहण्याचे वर्ष आहे त्यामुळे भविष्यासाठी ची तजवीज नाही जमली तरीही चालेल परंतु जर असे आजारपण नसेल तर आपण आधी केलेले सेविंग मोडावे लागणार नाही एवढी काळजी घेतली पाहिजे. आणि आपल्या कमी झालेल्या आत्ताच्या उत्पन्ना प्रमाणे आपले लाईफ स्टाईल ऍडजस्ट करावे लागेल. एक म्हण होती आपल्याकडे अंथरूण पाहून पाय पसरावे, त्यामुळे सध्याच्या स्थितीमध्ये पांघरूण मोठे करता येणार नसेल, तर सकारात्मक रित्या ते आखडत घेता आले पाहिजे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

परंतु जर असे आजारपण नसेल तर आपण आधी केलेले सेविंग मोडावे लागणार नाही एवढी काळजी घेतली पाहिजे.......... खरंय.

Dhanyavad