बैरागी

पाऊस असा बैरागी

Submitted by पुरंदरे शशांक on 29 July, 2024 - 13:42

पाऊस असा बैरागी

पाऊस असा बैरागी
वेशीवर येतो नकळत
रवितेज प्रखरसे अडवी
बाहूते बळकट पसरत

मेघांचे कुंतल भाळी
नेत्रातून चमके वीज
हलकेच डफावरी थाप
चहू दिशात उमटे साद

गिरिशिखरे निथळुन काढी
दरिखोरी भिजवून जात
ओढ्यातुन खळखळणारे
गुढ गभीर अनाहत गीत

झोळितून उधळे मोती
फेकीतो स्वैर झोकात
ते दान अनामिक गहिरे
साठवी धरणी उदरात

दमदार पाउले टाकी
तरुवेली झुकवुनी जात
हळुवार चाल कधि याची
मोडेना ईवली पात

साधू

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 6 June, 2019 - 12:24

साधू
*****
चिलीमीचे कश भरत ते होते
सवे काही बं बं घुमत ते होते
अध्यात्म तयांचे असले कसले
मजला मुळीच कळत नव्हते

जरी या जगाचे काहीच तयाला
सोयर सुतक मुळी ते नव्हते
भस्म देहावर टिळा भालावर
डोई वेढलेले जटाभार होते

गूढ शब्द काही ओठात तयांच्या
डोळ्यात जग वेगळेच होते
कुणी पोटभरू खरे कुणी होते
धुम्री मस्त कुणी त्यांचे तेच होते

विक्रांत तयाला नमितो दुरुनी
आग हाती घ्याया सांगा कोण जाते

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बैरागी