सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)
Submitted by पाषाणभेद on 10 January, 2020 - 19:06
(खालील लेख प्रचंड कंटाळवाण्या लेखकाचा अतिप्रचंड कंटाळवाणा आहे अन तो त्याने अगदी आळसात लिहिला आहे. लेख पूर्ण करण्यासही कित्येक दिवस - नव्हे, महिने लागलेले असल्याने तो आपणस कितपत रुचेल हे माहीत नसल्याने आपआपल्या जबाबदारीवर तो वाचावा. झोप येण्यासाठी वाचावयास उत्तम आहे. तरीही धीर करून वाचताना आळस आल्यास जिथल्या तिथेच थांबून एक आंघोळ करून यावी. किमानपक्षी तोंड धुऊन पुन्हा वाचनास बसावे. झालेच तर एक पाभेचा चहा घ्यावा .
भारतीय संस्कृतीत सकाळी उठल्याबरोबर पहिले आंघोळ आयुष्याचे अविभाज्य अंग आहे. आंघोळ केल्याशिवाय सहसा लोक बाहेर कामाला पडत नाहीत. अनेक जण चहासुद्धा घेत नाहीत. लहानपणापासून सकाळी उठल्याबरोबर आंघोळ हे इतके डोक्यात पक्के बसले होते की इतर संस्कृती/प्रदेशात दुसरी कुठली पद्धत असेल असे मनातदेखील कधी आले नाही.