चादर ट्रेक
शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक २
भाग १
https://www.maayboli.com/node/69326
भाग २ चालू
पूर्वपीठिका
लेहला पोहोचल्यावर रिपोर्टींग करून झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आमचे ब्रिफींग करण्याकरता सगळ्यांना बाहेरच उणे बारा तपमानात एकत्र जमायला सांगितले होते. इतक्या थंडीत बाहेर एकाच जागी उभे रहायचे म्हणजे जरा त्रासच होता. वारा तर जाऊच दे पण नुसती झुळूक जरी आली तरी अजूनच गारठायला व्हायचं. आम्ही सगळे मिळून जवळपास तीस जण असू त्यामुळे इतके सगळे नीट मावतील अशी जागा तिथे नव्हती आणि आता असं 'बाहेर' राहण्याची सवय करणे गरजेचे होते.
शुभ्र काही जीवघेणे - चादर ट्रेक १
खाली मान घालून पायाखालची वाट नजरेआड न करता एका मागोमाग एक असे आम्ही १९-२० जण नागमोडी वळणे घेत घेत चालत होतो आणि अचानक एका वळणा नंतर आमचा लीडर अचानक चित्कारता झाला. नक्की काय बोलतोय हे लगेच काही कळले नाही पण तो दाखवत होता त्या दिशेला पाहता ताज्या बर्फावर उमटलेले ते पावलांचे ठसे स्पष्ट दिसत होते आणि ते ज्या डोंगरदिशेला गेले होते तिकडे वरती आकाशात बरेच पक्षी घिरट्या घालत होते. लीडरच्या अंदाजानुसार ते ठसे बिबट्याचे होते आणि नुकत्याच केलेल्या शिकारीची चाहूल लागल्यामुळे ते पक्षी तिकडे जमा झाले असावेत.