मायाजाल
तूच निर्मिले देव, दानवा
अजब तुझा खेळ मानवा
जोडणार तू तूच मोडणार
तूच तुला घडविणार
बंधू-भगिनी पुत्र तनया
तुझीच रे ही सारी किमया
माय बाप पती अन् दारा
तूच पसरविला हा पसारा
सूत्र नात्याचे घेऊन सुंदर
विणलेस तू जाळे भयंकर
फसुनि त्यात भोगशी हाल
तुझेच असे हे मायाजाल
कोळीयासम स्वतः विणला
संसाराचा फास गळ्याला
सुटका ना तुझी ऐक मानवा
करणार कुणाचा सांग धावा
मुक्त जीवन तुला न आता
संसाराचा तुज असे शाप
निसर्गाशी भांडून फसला
छळणार तुला हे तुझे पाप
बऱ्याच दिवसांपासून या विषयावर लिहायचा विचार चालू होता पण लिहायला मुहूर्त लागत नव्हता.अश्याच काहि सेन्सेटिव्ह केसेसवर एक मित्र काम करतोय, त्याच्याशी बोलताना पुन्हा काहि धक्कादायक गोष्टी नव्याने समोर आल्या म्हणून आज लिहायला सुरुवात केली.
बकेट चॅलेंज किंवा आत्ता हल्लीचं किका का कुका काय चॅलेंज आलंय ते सर्वांना माहिती असेलच. यापूर्वी ही असे गेम येऊन गेले आहेत यातून घडलेल्या गंभीर घटना अनेकांनी वाचल्या/ऐकल्या ही असतील, सेम अश्याच प्रकारचे वेगवेगळ्या चॅलेंज देणाऱ्या साईट आहेत (काहि उघड तर काहि डार्क वेबची पयदायिश).