बऱ्याच दिवसांपासून या विषयावर लिहायचा विचार चालू होता पण लिहायला मुहूर्त लागत नव्हता.अश्याच काहि सेन्सेटिव्ह केसेसवर एक मित्र काम करतोय, त्याच्याशी बोलताना पुन्हा काहि धक्कादायक गोष्टी नव्याने समोर आल्या म्हणून आज लिहायला सुरुवात केली.
बकेट चॅलेंज किंवा आत्ता हल्लीचं किका का कुका काय चॅलेंज आलंय ते सर्वांना माहिती असेलच. यापूर्वी ही असे गेम येऊन गेले आहेत यातून घडलेल्या गंभीर घटना अनेकांनी वाचल्या/ऐकल्या ही असतील, सेम अश्याच प्रकारचे वेगवेगळ्या चॅलेंज देणाऱ्या साईट आहेत (काहि उघड तर काहि डार्क वेबची पयदायिश).
बऱ्याचदा या गेमच्या इंव्हिटीशनस् या जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीकडूनच येत असतात. त्यांच्यावर भरोसा ठेवून किंवा आहारी जाऊन किंवा आमिषाला बळी पडून लोक यात उतरतात.
सुरवात अगदी क्षुल्लक आणि फालतू वाटणाऱ्या गोष्टी पासून असते जस कि स्वतःचा एखादा फनी टाईप फोटो टाका/व्हिडिओ शेयर करा, मग नेक्स्ट स्टेप एखादा ऍडझव् टाईप फोटो/व्हिडिओ टाका, अमुक करा तमुक करा आणि त्याचे फोटो अपलोड करा वैग्रे वैग्रे वैग्रे.
सुरवातीला ही चॅलेंज छोटी छोटी असतात आणि प्रत्येक चॅलेंज पूर्ण केलं कि त्याचे रिवॉर्ड असतात, काहित फोटो/व्हिडिओ अपलोड करणाऱ्याला पैसे ही पे केले जातात.
नंतर पुढची स्टेप गर्लफ्रेंड किंवा बायको बरोबर फोटो टाका, मग किस करताना टाका, मग काहीतरी तुफानी फनी करताना टाका वैग्रे आणि त्याचे रिवॉर्ड + मनी.
एकदा सावज पूर्ण ताब्यात आल्यावर किंवा एडिक्शन झाल्यावर किंवा पैश्याची लत लागल्यावर मग एकत्र पॉर्न व्हिडिओ टाका त्याचे अमूक तमुक पैसे मिळतील वैग्रे सुरू होतं आणि माणूस यात एवढा अडकला असतो किंवा एडिक्शन झालं असतं कि तो पर्सनल गोष्टी शेयर करून बसतो.
यातलं एक उदा. म्हणजे हल्ली हल्ली ढिगाने कपल लोकांचे एकत्रित अलबम मोबाईलवर शेयर होत आहेत. असे अनेक अलबम सर्वांनी (खासकरून पुरुष मंडळींनी) पाहिले असतील ज्यात हे सर्व प्रकार आहेत आणि सगळीकडे सेम मेथड वापरली आहे. कपलला एक टास्क दिला जातो जे पूर्ण केल्यावर त्याला इमिजीएट रिवॉर्ड तसेच पैसे पाठवले जातात.
सुरवातीला त्यांचे लग्ना आधीचे फोटो, कधी सिंगल तर कधी एकत्र फोटो शेयर करायला सांगितलं जातं, मग एखाद्या फॅमिली फंक्शनचे फोटो शेयर करायला सांगितलं जातं, मग लग्नातील फोटो शेयर करायला सांगितलं जातं, मग हनिमून चे फोटो शेयर करायला सागितलं जातं वैग्रे वैग्रे. यात त्यानं हे सांगितलं जातं किंवा आश्वस्त केलं जातं कि हे विडिओ खाजगी आहेत, कुठे शेयर केले जाणार नाहीत, हा खेळातील एक फक्त टास्क आहे जो तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि केल्यावर पैसे ही मिळणार आहेत वैग्रे वैग्रे. पण हे साफ झूट असतं, हे विडिओ बाजारात विकले ही जातात आणि व्हायरल केले ही जातात. मग पुढे ब्लॅकमेलिंग आणि चमडीचा व्यवसाय सुरू होतो.
(खोटं किंवा अतिशयोक्ती सांगतोय अस वाटत असल्यास,गुगलवर सर्च करू शकता, एका क्लिकवर ढिगाने माहिती उपलब्ध आहे).
असो...., मूळ विषयावर येतो. यात थोडी सावधानी म्हणजे प्रसंग कोणताही असो अगदी आपला नवरा, मंगेतर, बॉयफ्रेंड असला तरी आणि त्याने कितीही फोर्स केला तरी आपले अत्यन्त खाजगी क्षण/प्रसंग याचे चित्रीकरण करू नये किंवा केले जाऊ नये याची संबंधीत महिलेनेचे काळजी घेतली तर कुठंतरी याला काही प्रमाणात मर्यादा घालणे शक्य आहे. शिवाय, हे वीगो विडिओ, ऑनलाइन चॅलेंज वैग्रे रिकामटेकडया धंद्यापासून तर पाहिले लांब राहिलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं कि लांब राहणार नवरा, बॉयफ्रेंड रात्रीच्या गप्पांगप्पांन मध्ये काहि नाजूक मागण्या करतो उदा. विडिओ चॅटमध्ये न्यूड फोटो पाठव वैग्रे वैग्रे. (पण ते ही चूकच किंवा धोकादायक), पण बॉयफ्रेंड वैग्रे कडून मग असले फोटो विडिओ मित्रांत शेयर केले जातात किंवा ब्लॅकमेल केलं जातं आणि मग पुढे फरफट आहेच.
खाली शेयर केलेले फोटो म्हणजे यातलाच दुसरा भाग.
तुमच्या एरियातला भाजीवाला, फळवाला किंवा रस्त्यावर दुकानात जिथे जिथे बाईचा वावर आहे तिथे असे फोटो काढले जातात. फोटो काढणाऱ्याला याचे पैसे ही मिळतात. आता हे फोटो काढणारे कोण ? तर कोणीही असू शकतं, अगदी घरी येणारा फेरीवाला पासून ते रस्त्यावर व्यवसाय करणारा कोणीही. अनावधानाने किंवा घाई गडबडीतील एक बेसावध क्षण आणि फोटो क्लिक, मग त्याचा पुरवठा, मग हे फोटो बाजारात आणून आंबटशौकीन मंडळींना पुरवले जातात. ही एक वेगळी आणि मोठी इंडस्ट्री कम बाजारपेठ आहे. बऱ्याचदा ब्लॅकमेलिंगसाठी किंवा बदनामी करण्यासाठी ही याचा वापर केला जातो (काहि वेळेस जाणूनबुजून काहीवेळेस अनवधानाने).
इथं थोडी भारतीय इंडस्ट्रीची माहिती. एका सर्व्हे नुसार इंटरनेटच्या माध्यमातून पॉर्न वेबसाईटवर विझिट देणाऱ्या/सर्च करणाऱ्या एकूण विझिटर्स पैकी ४५ ते ५०% विझिटर्स हे भारतीय लोक आहेत/असतात. या ४५ ते ५० टक्क्यात एकट्या दिल्लीचा शेयर ३० ते ३५% आहे. एकूण ७० ते ७५% मंडळी मोबाईल वरून पॉर्न साईटला भेट देत असतात यातील शहरी भागातील प्रमाण ५८% आहे. यावरून अंदाज लावता येईल कि या इंडस्ट्रीत नविन नविन "मटेरियलला" (फोटो/व्हिडिओ) किती मोठी मागणी आहे ते.
डोंबिवलीत एक किस्सा घडला होता. आरोपी (ज्याला पकडलं गेलं तो) ज्या बिल्डिंगमध्ये रहात होता त्याच्या खालच्या मजल्यावर एक सुंदर बाई रहात होती. बाई दिसायला खरोखरच सुंदर होती, रोज जाता-येता हा तिला बघायचा मनात खुष व्हायचा नी कामावर जायचा पण बोलायची कधी हिंमत केली नाही वा झाली नाही. एकदा ऑफिस पिकनिकला जाऊन आल्यावर बाहेर जात असताना खाली मजल्यावर पुन्हा ती बाई दिसली नी हा गडी डायरेक्ट घरात घुसून तिला तिचा एक नाईटचा रेट विचारू लागला. घाबरून तिने आरडाओरडा करून अक्खी सोसायटी जमा केली नी नंतर त्याला चोपून पोलिसांच्या ताब्यात दिलं. ताब्यात दिल्यावर मग जो तो ओकला त्यातून पोलीस तपासासाठी राजस्थानपर्यंत गेले. तिथे हॉटेलवर धाड टाकली आणि चौकशी केली असता चमडी व्यवसायातला छोटा मासा (agent) मिळाला, त्याने मग त्याच्याकडचा अल्बम दाखवला ज्यात त्या डोंबिवलीच्या बाईचा फोटो होता. नंतर त्या बाईकडे आणि तिच्या नवऱ्याकडे हा फोटो इथे कसा आला यासंदर्भात पोलिसांनी चौकशी केली असता हे लोक त्यांच्या उभ्या आयुष्यत कधीच राजस्थानला गेले नाही समजलं. मग पुन्हा agent ला कुटल्यावर त्याने त्याच्या सोर्सचं नाव घेतल्यावर सोर्स ने हे फोटो नेट वरून डाउनलोड केले मग त्या बाईचं अकाउंट शोधून तिचे काहि व्हिडिओ शोधून गिर्हाईकला दाखवायला ते ही डाउनलोड करून ठेवले. त्यांची कामाची पद्धत अशी कि गिर्हाईकला सुंदर स्त्रियांचे फोटो विडिओ दाखवायचा आणि नेमकी त्या डोंबिवलीवाल्या बाई सारखी बाई कोणी मगितली तर ती बुक झाली आहे दुसरी बघा असं सांगायचं. तो डोंबिवलीवाला माणूस असाच फसला होता, घरच्या खाली राहणारी आणि इथे अवेलेबल आहे बघून हा चाट पडला आणि मग जेव्हा पिकनिक संपवून घरी आला तेव्हा डायरेक्ट हिला घरात जाऊन रेट विचारला आणि मार खाल्ला. बरं ज्या बाईच्या बाबतीत हे घडलं ती खरोखर घरंदाज आणि कुलीन होती पण विचार करण्यासारखी गोष्ट ही कि त्या दलाला मार्फत कुठल्या कुठल्या लोकनपर्यंत तिचा "धंदेवाली" म्हणून फोटो फिरला असणार.
चांगल्या दिसणाऱ्या आणि चांगल्या घरातील शालीन/कुलीन/घरंदाज स्त्रियांचे फोटो/व्हिडिओ चोरणे आणि व्हायरल करणे यामागे हि एक वेगळी सायकॉलॉजी असते. भटकभवानीपेक्षा शरीफ आणि घरंदाज दिसणाऱ्या बायकांना (फोटो/व्हिडिओना) मार्केटमध्ये चांगली मागणी आहे/असते, कारण शरीफ आणि घरंदाज लोकांचे गॉसिप किंवा तोंडसुख घ्यायला सोकॉल्ड सर्वसामान्य लोकांना जास्त मजा येते/वाटेत (विकृत ह्यूमन सायकॉलॉजी).
असो, या विषयावर लिहू तितके कमी आहे एवढी ही इंडस्ट्री मोठी आणि महासागर आहे.
या गोष्टी मग बाजारात येतात ज्याला पॉर्न इंडस्ट्री बाजारात मोठी मागणी आणि रेडिमेड बाजारपेठ हि आहे. याची जागतिक बाजारपेठ किती मोठी आहे याचं एक उदाहरण देतो. पॉर्न इंडस्ट्री जागतिक बाजारपेठेत वर्षभरात एवढी कमाई करते कि त्यांनी जर ठरवले तर साधारणपणे ५.५ अब्ज लोकांना वर्षभर दोन टाईम रोज पोटभर जेवण देऊ शकतात एवढा पैसे यातून जमा होतो.
सायबर सेल ने गेल्या काही दिवस/महिनाभरात शेकडो ने या साइट्स शोधून ब्लॉक करून टाकल्या ज्यावर हे धंदे सुरू होते. शेकडो हे प्रमाण फारच फालतू आहे इतका हा प्रचंड मोठा हिमनग आहे. ते वीगो विडिओ की काय साईट आहे ती याच प्रकारातील शरीफ आवृत्ती आहे, तुमचे विडिओ टाका, आम्हीं प्रसिद्धी देऊ, सोबत पैसे ही कमवा वैग्रे वैग्रे आमिष. या असल्या प्रकारापासून चार हात लांब राहणे केव्हां ही उत्तम कारण हि सुरवात असते. आणि कोणावरही (अगदी तो कितीही जवळचा असला तरी) विश्वास न ठेवता स्वतः अखंड सावधगिरी बाळगणे. मुंबईत एक किस्सा असा घडला होता कि अत्यंत जवळच्या आणि जिवाभावाच्या मैत्रिणीनंच दुसऱ्या मैत्रिणीचे खाजगी फोटो/व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे नंतर पस्तवण्यापेक्षा आधीच खबरदारी घेतलेली केव्हा ही उत्तम.
प्रिव्हेन्शन इज अल्वेज बेटर दँन क्योर
साभार व्हॉटसअप अँड बरेच काही...,
खरेच , हा अवेअरनेस सध्या फार
खरेच , हा अवेअरनेस सध्या फार गरजेचा आहे.
इंटरनेटचा सावधगीरीने वापर
इंटरनेटचा सावधगीरीने वापर केलेलाच बरा.
खुप माहीतीपुर्ण लेख.