रांगोळी Submitted by पुरंदरे शशांक on 24 May, 2018 - 00:03 रांगोळी अंगणी रांगोळी रेखीव सुंदर रंगीत साजरा नाचरा मयूर मयूर पिसारा दिमाख आगळा चित्त आकर्षितो निलिमा जांभळा डौल मयुराचा रेषा उमलती मेघ पावसाळी मनी घुमडती रांगोळी मधुनी खुणावे जरासा नाचे मनमोर उजळल्या दिशा विषय: काव्यलेखनमनोरंजनशब्दखुणा: रांगोळीमनमोर