Submitted by पुरंदरे शशांक on 24 May, 2018 - 00:03
रांगोळी
अंगणी रांगोळी
रेखीव सुंदर
रंगीत साजरा
नाचरा मयूर
मयूर पिसारा
दिमाख आगळा
चित्त आकर्षितो
निलिमा जांभळा
डौल मयुराचा
रेषा उमलती
मेघ पावसाळी
मनी घुमडती
रांगोळी मधुनी
खुणावे जरासा
नाचे मनमोर
उजळल्या दिशा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दिशा उमलणारा ,
दिशा उजळणारा
मेघ घुमडणारा
अद्वितीय मनमोर विभोर .....
सुंदर!
सुंदर!
इकडे तुमची कविता आली आणि तिकडे आकाश भरून आलं.
खूप छान
खूप छान
खूप छान
खूप छान
मस्त!
मस्त!
सर्वांचे मनापासून आभार.....
सर्वांचे मनापासून आभार.....
______/\______
मस्त !
मस्त !