"यू हॅव बीन स्टेयिंग हिअर.... डुईंग व्हॉट????"
मोनालिसा गुप्ता भारतातून गायब झाल्याच्या सतराव्या दिवशी रेजिनाल्डो रिकार्डो डिसूझा अचंबीत होऊन तिच्याकडे पाहात सिंगापूरमधील त्या भव्य आणि अती आलिशान स्विटमध्ये स्तब्ध बसलेला होता. ती गायब झाल्याच्या चवदाव्या दिवशी तिनेच त्याला फोन करून गुप्तपणे येथे बोलवून घेतले होते. तमाम हेलिक्सच्या मते मोनालिसा यु.के.ला गेलेली होती. सुट्टीसाठी!
"अॅबॉर्शन"
मोनाचे हे उत्तर त्याच्या कानांमधून मेंदूत प्रवेशून मेंदूला ते नीटपणे जाणवायला दहा सेकंद लागले.
जयपूर पॅलेस!
एखाद्या सम्राटाच्या राजमहालासारख्या या हॉटेलमध्ये रेजिना मोनालिसाची पाठ थोपटत होता. रात्रीचे अकरा वाजलेले होते. मोनालिसा हमसून हमसून रडत होती. आज चार दिवसांनी एक स्वतंत्र श्वास तरी घेता आला होता तिला!
तो दिवस तिला आत्ताही आठवला.
सकाळी अकरा ते मध्यरात्री दिड! आंघोळ नाही की जेवण नाही! एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे तिला कायद्याला सामोरे जावे लागले होते.
गुन्हा एकच! बॅन केलेले ड्रग बाळगण्याचा!
हेलिक्समध्ये पत्ताही लागू न देता या चौकशीला तोंड देणे आणि त्यातही रेजिनासमोर हा सगळा अपमान होणे यामुळे मोनालिसा अक्षरशः उद्ध्वस्त झाली होती.
व्वा! काहीतरी दम आहे तर ट्रीपमध्ये!
मधुमतीच्या मनात आलेला हा विचार तिला एकदम उत्साहीत करून गेला. तीन दिवस झाले मॅडम रूममध्ये नुसत्या बसून होत्या! बाई आहे का भूत? मधुमतीने टीव्ही वरचे यच्चयावत कार्यक्रम पाहिले. आता तर ती अंदाजही करू लागली होती पुढे काय होणार याचा! हॉटेलच्या मेन्यूमध्ये असलेले सर्व पदार्थ आता खाऊन झालेले होते. बाहेरचा बर्फाळ पाऊस उगाचच घटकाभर थांबून पुन्हा हैराण करायला सुरुवात करत होता. मनालीच्या पब्लिकचे आयुष्य कसे असेल याचा विचार त्या उबदार रुममध्ये बसून मधुमतीने किमान तासाला एकदा केला असावा.
अफाट पैसा असणे हे जसे अनेकांचे स्वप्न असते त्याप्रमाणे अफाट पैसा असणे हे काहींचे दु:खही असू शकते.
हेलिक्सचा एक्कावन्न टक्के पैसा गुप्तांच्या बंगल्यात किंवा त्यांच्या नावावर होता हा मोनालिसाचा सर्वात मोठा प्रॉब्लेम होऊन बसला होता. कारण याच पैशासाठी जीवावर उठणारी माणसे सतत आजूबाजूला होती आणि त्यांच्याशी, 'सगळे माहीत असूनही' अत्यंत व्यवस्थित वागावे लागत होते.
वयाच्या सव्वीसाव्या वर्षी माणसाने किती आघाड्यांवर लढणे किंवा टिकून राहणे अपेक्षित असायला हवे खरे तर?
अत्यंत संमिश्र, गुंतागुंतीच्या वैचारीक मनस्थितीत मोना आत्ता बेडवर पहुडली होती. दुपारचे चार वाजलेले होते. भारतात येऊन दोन दिवस झालेले होते.
संजयच्या दृष्टीने आजचा दिवस म्हणजे खरे तर सुट्टीच होती. सकाळी काहीच काम नाही. ऑफीसलाही जायचे नाही. दुपारी एक वाजता निघायचे. आणि थेट पाचगणी!
रॅव्हाईन हे नवीन झालेले हॉटेल पाचगणीचे त्यातल्यात्यात असे हॉटेल होते जेथे मोनाने थांबावे.
संजय आरामात एस क्लास मर्सिडीझ चालवत होता. कात्रज घाट, खंबाटकी घाट, वाई फाटा आणि पसरणी घाट ओलांडून आता गाडी रॅव्हाईनच्या पार्किंगमध्ये येऊन थांबली आणि रॅव्हाईनच्या स्टाफमध्ये एकच गडबड उडाली. नाही म्हंटले तरी गाडी पाहिल्यावर आतमध्ये कुणीतरी बिग मॅन असणार याचा अदाज सगळ्यांनाच आला होता. मॅनेजरही धावला तेथे! कोण उतरले तर पंचवीस, सव्वीस वर्षांची एक मुलगी! एकटी!
कोरेगाव पार्क ते ब्ल्यू डायमंड अंतर असेल फार तर बारा मिनिटांचे कारने! एक जुनी अॅम्बॅसॅडर बंगल्यावर होती जी सायरा वापरायची. आत्ताही ती त्याच गाडीतून निघाली होती. रात्रीचे सव्वा नऊ झालेले! सायराचा पोषाख पाहून ब्ल्यू डायमंडमध्ये तिला कुणीच विचारणार नव्हते की कुणाला भेटायचंय! कारण एक तर तारांकित हॉटेल्समध्ये असे विचारता येत नाहीच, त्यात तिचा पेहेराव आणि चेहर्यावरील आत्मविश्वास पाहून कुणी तिच्याकडे लक्षही दिले नसते ती कोणत्याही रूममध्ये गेली असती तरीही!
पण आज... ! आज तिच्या चेहर्यावरील भाव जरी नेहमीप्रमाणेच असले तरी त्याच्या आत असलेल्या मनावर एक भयानक सावट होते.
स्वभावाने चांगले असण्याचे माणसांना एवढे वावडे का असावे हे मोनाला समजत नव्हते.
आपण सायराकडे शिल्पाला जी इमेल लिहायला संदेश दिला तो तिने फोन ठेवल्यावर पुन्हा आठवून पाहिला आणि ती स्वतःच दचकली.
आपण जतीन आणि सुबोध यांचा राजीनामा मागीतला? मोठेच नाट्य होणार आता!
रेजिनाला काहीही समजले नाही. केवळ अठराव्या तासाला मोना पुण्यात पोचलीसुद्धा!
पण... काही असो.... सिमल्याहून निघताना रेजिनाच्या डोळ्यात डोळे मिसळून 'बाय' केले तेव्हा...थोडेसे... थोडेसे कसले... बर्यापैकी वाईट वाटले दोघांनाही... पण पर्यायच नव्हता...
"सुबोध गुप्ता?? इस नामके तो चार लडके थे मेमसाब यहांपर?? आपको कौनसा चाहिये??"
"जिसके.. पिताजी का ये हॉटेल था..."
"यह तो श्रीवास्तव करके थे यु. पी. के.... उनका था... वे गुजरके भी बाईस साल हो गये..."
"... कोई... कोई गुप्ताजी का हॉटेल भी था यहांपर क्या??"
"ना... गुप्ताजी कोई नही थे हॉटेलवाले... क्युं छोटूकी मां??"
"ना ना.... हम नही जानते किसी गुप्तावुप्ताको..."
एक महिना!
अत्यंत तीव्र अप्स अॅन्ड डाऊन्स असलेला एक महिना!
हा महिना मागे टाकून मोनालिसा प्लेनमध्ये बसली होती. तिला खिडकीतील जागा मिळाली होती. शांतपणे बाहेर पाहात होती आणि टेक ऑफची वाट बघत बसलेली होती ती!
मोनालिसा गुप्ता! काय काय सोसता येईल एखाद्याला पंचविसाव्या वर्षी! किती धक्के? किती ताण? किती सुखे आणि किती दु:खे?
तो दिवस तिला आत्ता आठवला. सायरा बदलली आणि बंगल्यात राहायला लागली तेव्हापासून लोहियांना सायराकडून एकच कारण सांगण्यात आले...
"मॅम वॉन्टेड सम केअर टेकर, बट शी डिडन्ट गेट एनी, सो आय अॅम ट्रान्स्फर्ड अगेन..."