स्वभावाने चांगले असण्याचे माणसांना एवढे वावडे का असावे हे मोनाला समजत नव्हते.
आपण सायराकडे शिल्पाला जी इमेल लिहायला संदेश दिला तो तिने फोन ठेवल्यावर पुन्हा आठवून पाहिला आणि ती स्वतःच दचकली.
आपण जतीन आणि सुबोध यांचा राजीनामा मागीतला? मोठेच नाट्य होणार आता!
रेजिनाला काहीही समजले नाही. केवळ अठराव्या तासाला मोना पुण्यात पोचलीसुद्धा!
पण... काही असो.... सिमल्याहून निघताना रेजिनाच्या डोळ्यात डोळे मिसळून 'बाय' केले तेव्हा...थोडेसे... थोडेसे कसले... बर्यापैकी वाईट वाटले दोघांनाही... पण पर्यायच नव्हता...
आणि आत्ता स्वतःच्या घरात बसून ती विचार करत होती. लोक स्वभावाने चांगले का नसतात? अर्देशीर सर आणि लोहिया अंकलन डॅडनी अक्षरशः पार्टनर म्हणून स्वीकारले होते. नाहीतर ते एक कर्मचारीच राहिले असते. अशा परिस्थितीत हे चौघे आपले इतके वाईट का पाहात आहेत? ज्या गुप्त हेलिक्सच्या ताटात आयुष्यभर जेवले त्याच्यात का थुंकत आहेत? असे का वागतायत हे? काय कमी आहे? शेवटी डॅडची कंपनी आहे म्हंटल्यावर डॅडचाच सर्वाधिक फायदा नसणार का?
पण या चौघांनाच कशाला दोष द्यायचा?आपले सख्खे काकाच असे होते की? सुबोध श्रीवास्तवांचा मुलगा आहे. हे एक मोठेच रहस्य! कोणत्या गोष्टीवर आपण अवलंबून आहोत आज! एकाच गोष्टीवर! फसवेगिरी हा छंद किंवा प्रवृत्ती असणार्या चार माणसांच्या आधारावर आज आपण अवलंबून आहोत.
आणि... तसे अजिबात अवलंबून नसण्याकडे वाटचाल करणे.. ही एकमेव वाट आहे यशाची आणि सुरक्षिततेची! डॅनलाईन हातातून गेल्याने हेलिक्सचे काहीच नुकसान नाही आहे.
आणि लोहिया अंकलनी जतीन आणि सुबोध या दोघांचे रिटन एक्सप्लनेशन थांबवले आहे. त्या दोघांना घेऊन ते आत्ता, तासाभराने आपल्याकडे पोचतील! लंचसाठी! आणि समजावून सांगतील! मी कशी चूक केली. मी कसा अविश्वास दाखवला आपल्या अत्यंत विश्वासातील दोन वरिष्ठ अधिकार्यांवर!
आपल्याला ऐकून घ्यावे लागेल. कारण काय? तर आपण अननुभवी आहोत आणि हेलिक्सचा स्टाफ लोहियांना आपल्यापेक्षा अधिक महत्वाचे मानतो! आपण स्त्री तर आहोतच, त्यातही वयाने लहान आणि या बिझिनेसचा काहीही अनुभव नसलेली! केवळ वारसा हक्काने या जागेवर आलेली!
खाडकन उत्तर दिले लोहियांना तर? काय होईल? ते बिथरतील! कोणतीही टोकाची अॅक्शन घेणार नाहीत कारण हेलिक्सला त्यांना जळवेप्रमाणे चिकटायचे आहेत. आपले मत ऐकून घेतील आणि काहीतरी विचित्र कारणे सांगून जतीन आणि सुबोधला वाचवतील! त्या दोघांनी कसे जीवाचे रान केले सांगतील! अर्देशीर कसे वाईटावर आहेत ते सांगतील! आपले मन बदलायचा अथक प्रयत्न करतील! आपणही अगदी इतकी टोकाची भूमिका फार काळ ठेवू शकणार नाही. संधी मागतील आपल्याकडे आणखीन एक! जतीन आणि सुबोध शेवटी भाऊच आहेत म्हणतील! आजवर केलेल्या कर्तबगारीचे पाढे वाचले जातील! आपण विचित्र मनस्थितीत असताना असे काहीतरी लिहीलेले आहे का असे विचारतील! आणि आपण जितक्या तावातावाने बोलू तितक्याच आपण अडकत जाऊ! कारण आपल्याकडे येताना त्या तिघांकडे एक फूलप्रूफ समर्थन तयार असेल! आपल्याकडे फक्त इच्छा असेल! सूड घेण्याची! नुसत्य इच्छेवर काहीही करणे शक्य नसते हा अनुभव आपल्याला आणखीन एकदा येईल! मग आपल्यालाच समर्थन द्यावे लागेल! असे का म्हणाले अन तसे का म्हणाले!
शांत! अत्यंत शांतपणे हाताळायला हवी आहे ही परिस्थिती!
निवांत सोफ्यात पडून मोनालिसा विचार करत होती. एक तासाने तिघेही येणार होते. सायराला विचारून मोनाने जेवणाची सर्व तयारी ओके आहे हे कन्फर्म करून घेतले आणि आवरायला वर गेली.
आणि खाली आली तेव्हाच... भल्यामोठ्या दरवाजातून तिघेही आत येत होते... जतीन, सुबोध आणि लोहिया अंकल!
लोहिया - कैसी हो बेटा...??
मोना - आय अॅम गुड अंकल.. आप??
लोहिया - ठीक है बेटा... बैठो जतीन... सुबोध?? बैठो यार...
जतीन - हाय मोनी...
जतीन अजूनही मोनालिसाला 'मोनी'च म्हणायचा! सुबोध मात्र जरा वचकून मोना किंवा मोनालिसा म्हणायचा!
मोना - हाय...
सुबोध - हेलो मोना...
मोना - ... हाय ...
कुठे गेली होतीस, हवा पाणी कसे आहे, बिझिनेस कसा आहे वगैरे किरकोळ चर्चा होईपर्यंत बीअर सर्व्ह झाली. सायरानेही सगळ्यांना विश केले होते.
आता खरा टप्पा सुरू झाला.
लोहिया - बेटा ये क्या लिखदेते हो आप??
मोना - क्या हुवा अंकल??
मोनाचा शांतपणा जरासा अस्वस्थच करून गेला तिघांना! त्यांना जाणवले. ती काहीतरी फर्म भूमिका घेण्याच्या विचारात दिसत आहे.
लोहिया - ऐसे मेल्स लिखते है क्या बेटा? जतीन और सुबोध अपने कंपनीके इतने पुराने ऑफीसर्स है.. इतने जबरदस्त कॅपेबल है दोनो.. आजतक क्या क्या किया है दोनोने... आपने क्या लिखदिया इमेलमे? ऐसे करनेसे कंपनी कैसे चलेगी?
मोना - मैने यही लिखा अंकल के डॅनलाईन अपने हाथसे क्युं गया इसका क्लेरिफिकेशन दे दे या तो छोडजाये..
जतीन - मोना.. हाऊ कॅन यू जस्ट से लाईक दॅट आय मीन?????
मोना - एक मिनीट.. माझे आणि अंकलचे बोलणे आधी पूर्ण होऊदेत!
हा सरळ सरळ अपमान होता. पण अत्यंत शांत टोनमध्ये केल्यामुळे तो अधिकच जहरी झालेला होता. जतीनला खरे तर ताडकन उठून निघून जावेसे वाटले.
लोहिया - बेटा अपॉर्च्युनिटीज आती जाती रहती है... इसका मतलब ये थोडेही है के आप आदमीही बदल दे?
मोना - मै आदमी बदल नही रही हूं अंकल.. मै सिर्फ एक्स्प्लनेशन मांग रही हूं...
लोहिया - देखो.. हुवा ये है के अर्देशीरने अॅट्रॅक्टिव्ह टर्म्स ऑफर किये... डॅनलाईनको...
मोना - क्या टर्म्स थे??
लोहिया - ही इज रेडी टू वर्क ऑन ओन्ली फाईव्ह परसेन्ट कमिशन.. अॅज अगेन्स्ट अवर ट्वेल्व्ह परसेंट..
मोना - ये चीज तो डिस्कसही नही हुई है.. जहांतक लास्ट डेव्हलपमेन्ट मुझे याद है.. द ओन्ली डिस्कशन दॅट वॉज गोईन्ग ऑन वॉज अबाऊट सर्व्हीस ऑफ द इक्विप्मनेट्स??
लोहिया - बरोबर आहे.. पण त्यानंतर हा विषय निघाला...
मोना - अच्छा! म्हणजे मी बॅन्गलोरला गेले त्या दिवशी हा विषय निघाला आणि काल फायनलही झाला... आणि आपण कित्येक महिने त्यांच्याकडे व्हिजिट्स करतोय, सतराशे साठ इमेल्स आहेत, त्यांचे होकार आहेत, हे सगळे केवळ अडीच दिवसात कचर्यात गेले??
मोनाचा हा प्रश्न नाही म्हंटले तरी बिचकवूनच गेला तिघांना! का कुणास ठाऊक, जतीन आणि लोहियांना मोनाचा तो स्वर मोहन गुप्तांच्या स्वरासारखाच भासत होता.
लोहिया - लेकिन जतीन और सुबोधने क्या किया है??
मोना - दे वेअर हॅन्डलीन्ग डॅनलाईन...
लोहिया - सो वॉज आय अॅन्ड यू युअरसेल्फ टू..
मोना - होय... पण मी जबाबदारी घ्यायला तयार आहे... मी आत्ता डॅनलाईनला चार टक्यांची ऑफर देते.. मग ज्यांना मी या जबाबदारीवर ठेवलेले आहे त्यांनी अर्देशीरांकडून ते प्रपोजल हेलिक्सच्या पदरात ओढून आणावे.
लोहिया - वुई कॅन नॉट ऑपरेट अॅट चार टक्के...
मोना - व्हाय??
लोहिया - अवर कॉस्ट्स आर टू हाय....
मोना - नो इश्यूज.. चार टक्के तर चार टक्के.. थोडा कमी फायदा होईल...
लोहिया - थोडा?? थर्टी परसेन्टवर येईल प्रॉफिट...
मोना - अंकल मीही त्या फिगर्स अभ्यासलेल्या आहेत... मुळात तत्वतः मुद्दा असा आहे की मी आत्ता या क्षणी चार टक्यांना क्लीअरन्स दिला तर मला ते प्रपोजल पुढच्या अडीच दिवसात फेवरेबल करून मिळेल का??
लोहिया - असे कसे अचानक काहीतरी होईल??
मोना - अचानक? आपल्या हातून प्रपोजल अचानकच गेले ना??
लोहिया - अचानक नाही गेलेले...
मोना - ... मग??????
लोहिया - नक्कीच अर्देशीर आपल्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यांनी बुद्धी चालवून नेमक्या वेळी डॅनलाईनला आकर्षक ऑफर दिली...
मोना - हेलिक्समधल्या एकालाही बुद्धी चालवायला आपण नाही म्हणालेलो नाही मला वाटते...
लोहिया - आय थिंक यू आर .. यू नो.. यू आर टॉकिंग.. अ बिट... रफ बेटा...
मोना - रफ आणि स्मूथचा प्रश्नच नाही... सरळ मुद्दा आहे.. अर्देशीर सरांनी नेमक्या वेळी बुद्धी चालवली... आपण सहा महिने बुद्धी चालवत होतो... मग आपणही नेमक्याच वेळी का नाही चालवली...
लोहिया - सी.. द थिन्ग्ज आर नॉट लाईक हाऊ यू आर सीईंग देम...
मोना - ओके... देन आय नीड अ पर्स्पेक्टिव्ह ऑन द होल इश्यू.. मी तेच विचारत होते कालपासून..
लोहिया - आय'ल गिव्ह यू द पर्स्पेक्टिव्ह.. मोना... बेसिकली.. डॅनलाईन नोज देट अवर कोअर बिझिनेस इज गिअर्स... प्रामुख्याने आपण एक गिअर्स बनवणारी कंपनी आहोत... डॅनलाईन इक्विपमेन्ट्सचे क्लाएन्ट्स आणि आपले क्लाएन्ट्स जवळपास सेम आहेत या एकाच ताकदीवर आजवर आपण त्यांच्याशी बोलत होतो. डॅनलाईनने या कालावधीत आपल्याला हा सुगावा कधीच लागू दिला नाही की दे आर पॅरलली डिस्कसिंग द सेम प्रपोजल विथ अदर्स टू! आता आपण काही अगदिच बेसावध नव्हतो. मात्र आपल्याकडे त्यांच्या इमेल्स होत्या, अॅग्रीमेन्ट्सचे ड्राफ्ट्स डिस्कस होत होते, व्हिजिट्स चाललेल्या होत्या, आपण इव्हन सर्व्हेही कंप्लीट केलेला होता. अशा परिस्थितीत परवा रात्री, म्हणजे त्यांच्या दुपारी त्यांनी आपल्याला एक इमेल पाठवली की त्यांचा इन्टरेस्ट गेलेला आहे. आपण त्यावर घनघोर चर्चा केली त्यांच्याशी! पण हे फॉरीनर्स... यू नो देम! ते इतके स्ट्रेट फॉरवर्ड असतात की मॅटर इज क्लोज्ड व्यतिरिक्त काही बोलेचनात! शेवटी डी जी एफ टी मधला माझा मित्र, असिस्टन्ट डायरेक्टर ऑफ फॉरीन ट्रेड, गिरिजाशंकरचा मला फोन आला काल सकाळी! तो म्हणे अर्देशीर अनेक चकरा मारून गेले डीजीएफटीच्या! मला काही समजेना! अर्देशीर काय करत असतील! मी माहिती काढली तर धक्कादायकच माहिती होती. डॅनलाईनला त्यांनी वळवून घेतले होते. या सगळ्यामध्ये... आपण इन्कर केलेली ट्रॅव्हलिंग कॉस्ट आणि कम्युनिकेश कॉस्ट सोडली तर आपला खरे तर काहीही तोटा झालेला नाही. अशा संधी मिळणे व न मिळणे अशा दोन्ही गोष्टी बघतच माझे काळ्याचे पांढरे झालेले आहेत. इन फॅक्ट मोहन असते तर त्यांनी आत्तापर्यंत डॅनलाईन हा विषय विस्मरणातही टाकला असता. आय अॅम सॉरी! पण तू जी स्टेप घेत आहेस ती माझ्यामते खूपच कठोर, विचारपुर्वक न केलेली आणि भावनिकतेतून जन्मलेली रिअॅक्शनरुपी स्टेप आहे. सो.. आय मीन... आय वुड से दॅट... लेट्स फर्गेट ऑल धिस अॅन्ड से चीअर्स...
सुबोध आणि जतीन कडवटपणे पण आशाळभूतपणे मोनाकडे पाहात होते. अजून सुबोधने पहिला घेतलेला घोट सोडला तर बीअरच्या ग्लासला हातही लावलेला नव्हता. स्वप्नेच उद्ध्वस्त व्हायला आली होती सगळी!
मोना - अंकल.. थॅन्क यू.. मी या सर्व गोष्टी अनुभवलेल्या असतीलच असे नाही... पण...
तिच्य वाक्याच्या पहिल्या भागामुळे तीन चेहरे पल्लवीत झालेले होते. पण नंतरच्या 'पण' मुळे ते पुन्हा विझतात की काय अशी परिस्थिती आली.
लोहिया - .. येस?? ... पण काय???
मोना - पण मूळ प्रश्न तसाच आहे ना? समजा आपण चार टक्के ऑफर केले तर आपल्याला पुन्हा मिळेल का प्रपोजल??
लोहिया - आय टोल्ड यू.. आपल्याल चार टक्के नाही परवडणार.. आणि डॅनलाईन प्रोफेशनल आहेत.. एकदा अर्देशीरबरोबर साईन केल्यावर ते मागे वळणार नाहीत...
मोना - म्हणजे... आपण प्रोफेशनल नाही आहोत...!!!!!
लोहिया - मीनिंग???
मोना - आपल्याशी महिनोनमहिने सतत करस्पॉन्डन्स करून शेवटी अर्देशीरांच्या पदरात अॅग्रीमेन्ट टाकणारे डॅनलाईन प्रोफेशनल आणि आपण शिस्तीत सगळे काही करत असताना आणि बेसिक मुद्दाच निपटलेला असताना, म्हणजे कमिशनचे पर्सेन्टेज दोन्ही बाजूंना मन्य असताना आपल्याला काही न मिळणे याचा अर्थ आपणच प्रोफेशनल नाही आहोत ना..
लोहिया - बेटा... झाले ते झाले.. अर्देशीरने सूड उगवला...
मोना - असे कसे झाले ते झाले?? आय विल स्पीक टू डॅनलाईन...
लोहिया - शुअर... यू कॅन.. एनीटाईम...इन फॅक्ट यू शुड.. म्हणजे तुला या दोघांची काहीच चूक नव्हती हे कदाचित लक्षात येईल..
मोनाला समजले. डॅनलाईनमध्ये आधीच फिल्डिंग लागलेली असणार आपला फोन आला तर काय उत्तर द्यायचे ह्याची!
मोना - ठीक आहे... तुम्ही अर्देशीरांशी बोलू शकाल??
चक्रावलेच लोहिया!
लोहिया - ... क.... का?? कशासाठी??
मोना - शाहरुखमध्ये हेलिक्सचे शेअर्स असावेत यासाठी???
लोहिया - छ्या! काहीतरी काय? ते कसे देतील??
मोना - डॅडनी त्यांना जसे हेलिक्सचे दिले होते तसे??
चपराक! साट्टकन चपराक बसल्यासारखा चेहरा झाला लोहियांचा! कारण त्यांनाही हेलिक्सचे शेअर्स असेच मिळालेले होते.
लोहिया - वेल.. बिझिनेसेस डोन्ट रन ऑन सेन्टिमेन्ट्स मोनालिसा...
'मोनालिसा'! संपूर्ण नांव कधीच उच्चारायचे नाहीत अंकल! आत्ता उच्चारले.
मोना - सो.. नाऊ आय'ल गिव्ह अ पर्स्पेक्टिव्ह.. बघा तुम्हाला कस वाटतो.. डॅनलाईन नावाचे एक प्रपोजल मी या कंपनीत आणले... आपण सगळ्यांनी त्याचा अभ्यास केलेला होता आणि सगळ्यांना माहीत आहे की ते अत्यंय लुक्रेटिव्ह प्रपोजल होते.. आज आपले नुकसान काहीच झालेले नसले तरी होऊ शकणारा प्रचंड फायदा आपल्याला आता होणार नाही आहे.. आपण त्या प्रपोजलला शेवटपर्यंत व्यवस्थित न्यायची जबाबदारी या दोघांवर सोपवलेली होती.. याच दरम्यान अर्देशीर भांडून बाहेर पडले.. बाहेर पडताना त्यांनी 'मी हेलिक्स संपवेन' अशी धमकीही दिली मला माझ्याच केबीनमध्ये... आणि आपण डॅनलाईनशी चोवीस तास सात दिवस बोलत होतो.. कुठेही असा संदेहही घ्यायला जागा नव्हती की हे प्रपोजल हातचे जाईल.. हातचे जाईलच काय? इव्हन पुनर्विचारात घेतले जाईल असेही लक्षण नव्हते कुठे.. जवळपास सगळे ठरले.. अॅग्रीमेन्ट्सचे ड्राफ्ट्स दोन्हीकडून नव्वद टक्क्याच्या वर ओके झाले.. दोन महिन्यांनी कदाचित पहिले ट्रॅन्झॅक्शनही होईल इतपत वेळ आली... सर्व संबंधीत शासकीय संस्थांना आपण अशा अॅरेन्जमेन्टची कल्पनाही दिलेली होती... लायसेन्सेसचे काम सुरू करायचे होते... फन्डिन्गवर चर्चा चाललेली होती.. मी अडीच दिवस बॅन्गलोरला गेले... आणि आज बातमी काय तर अर्देशीर सरांना डॅनलाईनचे प्रपोजल मिळाले... हेलिक्सला नाही... नाऊ... टेल मी वन थिंग अंकल... हाऊ... आय मीन हाऊ डज एव्हरीथिंग फिट प्रॉपरली इन द स्लॉट?? काहीतरी गॅप आहेच ना???
सुबोधने पहिल्यांदाच तोंड उघडले.
सुबोध - गॅप हीच आहे की आपल्याला हे माहीतच नव्हते की डॅनलाईन पॅरलली आणखीन कुठे यावर बोलत असेल...
मोना - एक्झॅक्टली... आणि आपण स्वतःला मार्केटमधील एक स्मार्ट कंपनी समजतो...
सुबोध - म्हणजे??
मोना - ही इन्फर्मेशन जर आपल्याला आठ आठ ट्रीप्स स्पेनला करून मिळत नसेल तर आपला इन्टेलिजन्स काय आहे?? अर्देशीरांना काय दोन दिवस चर्चा करून हे प्रपोजल मिळाले आहे?? दोन दिवसात सगळे प्रोज आणि कॉन्स अभ्यासले त्यांनी??
सुबोध - शक्य आहे की ते आधीपासूनच त्यात इन्व्हॉल्व्ह्ड असावेत...
मोना - फक्त आपल्याला ते आज समजले..
सुबोधची मान खाली गेली. आता जतीनने मुक्ताफळे सुरू केली.
जतीन - आय कॅन एक्स्प्लेन इट मोनी...
मोना - फर्स्ट ऑफ ऑल स्टॉप कॉलिंग मी मोनी...
सायरा आणि शामासुद्धा दचकल्या मोनालिसाचा तीव्र आवाज ऐकून! लोहिया गंभीर नजरेने मोनाकडे पाहात होते.
जतीन - सॉरी...
मोना - यू शूड बी... नाऊ टेल मी.. व्हॉट एक्सप्लनेशन डू यू हॅव???
जतीन - बेसिकली अर्देशीर हुषार आहेत..
मोना - मग तू काय आहेस????
थोबाडात मारल्यासारखा चेहरा झाला जतीनचा! झक मारली अन हिच्या बंगल्यावर आलो असे वाटले त्याला! त्याचवेळेस पायाखालची वाळूही सरकलेली होती. त्यात सायरासमोर इतके रामायण म्हणजे अपमानाचा कळस होता.
लोहिया - मोना... आय.. आय सजेस्ट दॅट वुई ऑल मेन्टेन द डेकोरम ऑफ द मीटिंग...
मोना - ऑफ कोर्स... ऑफ कोर्स अंकल... मी अत्यंत शांतपणे विचारते.. अर्देशीर हुषार आहेत हा जर आपल्या कंपनीचा प्रॉब्लेम असेल तर आपल्या कंपनीत असलेली माणसे नेमकी काय आहेत??
लोहिया - नो ... नो.. अर्देशीर हुषार आहेत हा आपला प्रॉब्लेमच नाही आहे..
मोना - मग??
लोहिया - हे प्रपोजल दुर्दैवाने हातातून गेलेले आहे.. मात्र यासारखी..
मोना - ते दुर्दैवाने गेलेले नाही...
आता मात्र लोहियाही अतीगंभीर झाले. मोना ऐकायलाच तयार नव्हती. बहुधा एक घाव दोन तुकडेची वेळ येणार असे वाटू लागले होते. सुबोध मात्र ऑफ झाला. त्याला ते टेन्शन सहनच झाले नाही.
सुबोध - ओक्के... फाईन.. यू वॉन्ट टू व्हिक्टिमाईझ मी... यू वॉन्ट मी टू लीव्ह... हेच ना???
मोना - आयदर यू गिव्ह अ जस्टिफायेबल रिझनींग ऑर लीव्ह.. अगदी हेच...
सुबोध - आणि आम्ही दोघे जीवाचे रान करत स्पेनला रात्री बेरात्री ट्रीप्स करत होतो तेव्हा तू स्वतः सिमल्याला आराम करत होतीस....
ताळतंत्र सोडल्याचा परिणाम होता हा! सुबोध दाखवायला हे गेला होता की मोनाला स्वतःला डॅनलाईनमधे काहीच करणे शक्य नव्हते कारण तिला अक्कलच नव्हती आणि ती सिमल्याला आराम करत होती. पण त्यातून निष्पन्न फार भलतेच झाले होते. चक्रावून लोहिया आणि जतीन सुबोधकडे पाहात होते आणि मोना मागे वळून सायराकडे! सुबोधने बॅन्गलोरच्या ऐवजी चुकून पटकन सिमल्याचे नांव घेतलेले होते आणि आता स्वतःच हादरल्यासारखा दिसत होता.
मोना - सायरा.. तू सांगीतलंस सुबोध सरांना?? मी सिमल्याला होते म्हणून...
सायरा - .. आय... आय मीन.. अॅबसोल्यूटली नॉट मॅम.. यू कॅन आस्क हिम...
मोना - तुला कसे माहीत सुबोध मी सिमल्याला होते???
लोहिया - तू सिमल्याला होतीस??????
मोना - होय...
लोहिया - का????
मोना - सहज...
लोहिया - म्हणजे??
मोना - माझ्य एका मैत्रिणीचे लग्न होते तिथे...
लोहिया - बट यू टोल्ड मी बॅन्गलोर...
मोना - हो... कारण माझ्या हालचालींवर अर्देशीरांचे फार लक्ष आहे...
लोहिया - म्हणजे काय?? मी काय ते अर्देशीरना सांगणार होतो??
मोना - अंकल?? काहीतरी काय?? विल आय एव्हर डाऊट यू?? मी हल्ली उगाचच गुप्तता पाळते...
लोहिया - सुबोध?? तुला माहीत होते???
सुबोध - .... होय....
मोना - कसे काय??
सुबोध - सिमल्यात माझे लहानपण गेले आहे.. देअर आर सो मेनी पीपल हू नो मी व्हेरी व्हेरी वेल.. त्यांच्यातल्या एकाचा फोन आला... की तुझ्या कंपनीच्या हेड इथे आलेल्या आहेत...
मोना - पण मी सिमल्यात असण्यात तुला काय प्रॉब्लेम होता???
सुबोध - मी कुठे म्हणतोय मला काही प्रॉब्लेम आहे???
मोना - मग तू कशाला निघाला होतास सिमल्याला???
खर्रकन चेहरा उतरला सुबोधचा! त्याने तिकीटे बूक केली होती हे मोनाला समजले असेल ही शक्यताच त्याने गृहीत धरलेली नव्हती.
पण आता त्याने त्याच गोष्टीचे भांडवल केले.
सुबोध - अच्छा? .. मग हे तुला कसे कळले??
मोना - पर्ल ऑफ शिमलाच्या माणसाने सांगीतले.. तुमच्या कंपनीच्या आणखीन एकांचे इथे बुकिंग आले आहे म्हणून...
सुबोध - माझे अनेक मित्र आहेत तिथे... मी कशाला पर्लचे बुकिंग करेन??
मोना - मला काय माहीत???
सुबोध - यू... तू ... काहीही सांगतीयस...
मोना - काहीही?? अंकल.. मला एक सांगा... सुबोधला जर माहीत आहे की मी सिमल्यात आहे आणि त्याने जर सिमल्याचीच तिकीटे बूक केली असतील तर त्याने मला कळवायला नको का की तोही येतोय म्हणून???
सुबोध - नंबर कुठे ठेवला होतास तू??
मोना - सायराकडे होता की नंबर... आणि तुझे इतके मित्र आहेत तर पर्ल ऑफ शिमलाचा नंबर नाही मिळणार तुला??
भांडणे फारच वैयक्तीक स्वरुपाची होऊ लागली होती. जतीन आणि लोहिया खुळ्यासारखे या दोघांकडे पाहात होते. काही झाले तरी हे दोघे 'गुप्ता' होते.
लोहिया - एक मिनीट... हे सिमला वगैरे जरा बाजूला ठेवा.. मूळ मुद्यावर या दोघेही...
मोना - अंकल.. आय निड एक्स्प्लनेशन ऑन डॅनलईन फ्रॉम दिज बोथ...
लोहिया - तू तेच तेच बोलतीयस... त्यात एक्स्प्लनेशन देण्यासारखे जे काही आहे ते सगळे आधीच बोलून झालेले आहे...
लोहियांचा आवाज किंचित वर गेलेला होता.
मोना - ओके... आय डू नॉट अॅग्री विथ सच चाइल्डिश एक्सप्लनेशन अॅन्ड आय रिक्वेस्ट बोथ ऑफ यू टू कीप पेपर्स...
भयानक गांभीर्य निर्माण झाले. सगळ्यांना मोनाचे हे वागणे रडक्या, खेळात सतत राज्य आले म्हणून चिडणार्या मुलीसारखे आहे हे दाखवायची मगाचपासून फारच घाई झालेली होती. पण आता मात्र हादरायचीच वेळ आली होती. जतीनचा स्वर आता भलताच उंचावलेला होता. आणि सगळ्यांचाच!
जतीन - मोनालिसा... वुई आर कझिन्स...
मोना - होय... सो आय विल कीप टायिंग राखी अॅन्ड टेकिंग स्वीट्स फ्रॉम यू बट वुई कान्ट वर्क टुगेदर...
जतीन - मोना... तू कॉलेजमध्ये असल्यापासून मी हा बिझिनेस बघतोय.. मामांनी मला या बिझिनेसमध्ये संधी दिली आणि वेळोवेळी मी तिचे सोने करून दाखवले आहे.. आज आपल्याकडे असलेल्यातील सत्तर टक्के मार्केट मी गेली सात वर्षे मेन्टेन आणि इम्प्रूव्ह करत आहे.. या कालावधीत मी समोर आलेल्या बहुतांशी प्रोजेक्ट्सना यशस्वी करून दाखवलेले आहे.. असे असताना केवळ एका प्रोजेक्टवरून हा असा डिसीजन इव्हन मामांनी स्वतःही घेतला नसता...
मोना - वेल सेड जतीन... आणि मला जरी भूतकाळ पूर्ण माहीत नसला तरीही कागदपत्रे वाचून आणि आजची परिस्थिती पाहून मला इतके नक्की समजते की तुझ्या प्रत्येक अॅचिव्हमेन्टनंतर तुला प्रमाणाबाहेर आर्थिक फायदा डॅडनी दिलेला आहे... आणि तेही... केवळ एक भाचा म्हणून.. मला सांग जतीन... तुझ्यापेक्षा क्वालिफाइड लोक असतानाही डॅडनी तुझ्या आयुष्याचे सोने केले हे तू कसे काय विसरलास??
जतीन - मी मुळीच विसरलो नाही आहे... आय अॅम जस्ट मेकिंग यू अवेअर दॅट यू डोन्ट डिझर्व्ह टू बी...
नको ते शब्द! अत्यंत नको ते शब्द तोंडात आले होते जतीनच्या! रक्तातच होते म्हणा ते! मोहन गुप्तांनी उचलून कडेवर घेतल्यामुळे मोठे झालेले बालक होते ते! शेवटी गुप्ता ते गुप्ता आणि खन्ना ते खन्नाच!
मोना - आय डोन्ट डिझर्व्ह व्हॉट?? टू बी द हेड ऑफ हेलिक्स?? ऑर आय डोन्ट डिझर्व्ह कलीग्ज लाईक यू??????
काही बोलण्यासारखे राहिलेलेच नव्हते. ताडकन उभा राहिला जतीन! आणि पाठोपाठ सुबोधही! लोहियांना स्वतःच्या भावना दर्शवणे शोभणारे नव्हते. अजून ते मोनाच्या तडाख्यात व्यक्तीशः आलेले नव्हते.
जतीन - आय.. आय हॅव बीन टेलिंग लोहिया अंकल फ्रॉम डे वन.. यू ... यू आर जस्ट अ किड.. यू डोन्ट नो ए बी सी डी ऑफ बिझिनेस.. यू इन फॅक्ट डोन्ट इव्हन डिझर्व्ह टू बी अ डॉटर ऑफ मिस्टर मोहन गुप्ता...
मोना - इनफ... नाऊ गो अवे अॅन्ड सेन्ड यूअर रेसिग्नेशन ऑन इमेल... आय डोन्ट इव्हन वॉन्ट टू टॉक टू यू...
जतीन - शुअर.. हू वॉन्ट्स टू टॉक टू यू आयदर??? मी... मी एकच सांगतो... डॅनलाईनचे प्रपोजल अर्देशीरांना मिळाले हेच चांगले झाले.. यू वूड हॅव सिम्पली स्क्रूड द होल थिंग...
मोना - जतीन... लॉन्ग बॅक आय हॅड टोल्ड यू... अ फिमेल कॅन गिव्ह बर्थ टू अ मेल अॅन्ड कॅन ऑल्सो बी अॅज अ ग्रेट प्रोफेशनल परफॉर्मर अॅज अ मेल... बट अ मेल नीड्स अ फिमेल इव्हन टू टेक द बर्थ... टूडे यू हॅव प्रूव्ह्ड मी राईट... यू लॉस्ट डॅनलाईन..आय विल गेट इट बॅक...
जतीन - नॉन्सेन्स.. यू हॅव ऑलरेडी लॉस्ट इट यू फूल.. आय अॅम लीव्हिंग...
सुबोध - सो अॅम आय... गुडबाय मोना...
एक भयाण शांतता, चार अर्धवट असलेले बीअरचे ग्लासेस, अनेक फुटांवर भयचकीत होऊन ट्रॉली घेऊन उभी असलेली सायरा, एक विशाल बंगला आणि त्यात भण्णपणे बसलेली दोन माणसे...
... लोहिया... आणि मोना...
सहा ते सात मिनिटे.. अत्यंत मनस्तापाची ती मिनिटे... एकदाची संपली आणि लोहियांनी तोंड उघडले..
लोहिया - यू.. मेड अ मिस्टेक.. दे वेअर ओल्ड लेफ्टनंट्स ऑफ हेलिक्स...
मोना - सिनिऑरिटी इज नॉट अॅज इम्पॉर्टन्ट अॅज परफॉर्मन्स अंकल... लीव्ह इट...
लोहिया - नाऊ यू शूड बी मोर केअरफूल... दे विल सर्टनली जॉईन अर्देशीर...
मोना - ...... इट्स 'वुई'.... 'वुई' शूड बी मोअर केअरफूल अंकल...
साठ टक्के हेलिक्स उद्ध्वस्त झालेले डोळ्यांनी पाहात असतानाच लोहियांच्या डोळ्यासमोर त्या वाक्याने गरगरलेच! ही मूर्ख मुलगी जर उद्या फतवा काढून बसली की सगळे रिपोर्टिंग हिला आणि सगळे डिसीजन्स हिच्या सहीने तर आपली वाताहात होईल!
पटकन त्यांनी बाजू सावरली...
लोहिया - ऑफ कोर्स आय मीन वुई.. ती फक्त.. एक बोलण्याची शैली होती बेटा...तुला.. माझ्याबद्दल काही राग नाही ना??
मोनालिसा उठली. लोहियांच्या जवळ गेली. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून खूपच विद्ध स्वरात म्हणाली...
"डॅडच्या जागी मानते मी तुम्हाला अंकल.. तुमच्याही रक्तात हेलिक्सच आहे.. आणि माझ्याही... ही तुमची आणि माझी कंपनी आहे... काय बोलताय तुम्ही??.. मी.. मी तुमच्यावर रागावले तरी तुमच्या मुलीसारखी रागावेन.... "
अंकल जरासे शांत झाले. त्यांनी मान समाधानाने डोलावत समोरच्या टी पॉयकडे वळवली. त्याचवेळेस मोना सायराकडे वळून पाहात होती. दोघीही गुढपणे हासत होत्या. मंद.. मंद!
लोहिया उभे राहिले. मोना स्वतःच्या जागेवर जाऊन बसली. लोहिया तिरक्या नजरेने सायराकडे पाहात म्हणाले..
"बेटा.. झाले ते झाले.. जाऊदेत... वाट बघू आपण चांगल्या काळाची.. तसेही.. बिझिनेसचे काहीच बिघडले नाही आहे... बाय द वे.. मी आज पुण्यातच थांबायचे म्हणतोय..."
"हो?? मग इथेच या ना अंकल राहायला??"
"अं.. अॅक्च्युअली एक मीटिंग आहे ब्ल्यू डायमंडला... त्यामुळे तिथेच बुकींग केलंय..."
ब्ल्यू डायमंडचे नाव उच्चारताना त्यांनी सायराकडे हळूच पाहिले होते.
===============================================
एक उदास संध्याकाळ येऊ घातलेली होती! चार वाजलेले होते. उद्याच हेलिक्समध्ये वार्यापेक्षा वेगात ती बातमी फिरणार होती. जतीन खन्ना आणि सुबोध गुप्ता आउट! हादरणार होते हेलिक्स! अक्षरशः! पण हे वादळ थोपवायलाच लागणार होते. कदाचित, आधीच बातमी लागलीही असेल काही जणांना!
स्पेनमध्ये आता दहा वाजलेले असतील!
मोनाने शिल्पाकडून तिथला नंबर घेऊन सायराला कॉल लावायला सांगीतला.
डॅनियल बॅरेट नावाचा चीफ होता तिथे!
मोना - हाय.. धिज इज अ कॉल फ्रॉम इन्डिया.. मे आय स्पीक टू मिस्टर बॅरेट?? आय अॅम कॉलिंग फ्रॉम गुप्ता हेलिक्स...
डॅनी - ... ओह... गुप्ता हेलिक्स... मे आय नो हू इज ऑन द लाईन???
मोना - आय अॅम मोनालिसा... द हेड ऑफ धिस कंपनी...
डॅनी - यॅ यॅ... आय नो यू व्हेरी वेल.. वुई हॅव टॉक्ड... दो अ फिव टाईम्स...
मोना - यॅह... सो हाऊ इज एव्हरीथिंग??
डॅनी - व्हेरी वेल?? व्हॉट मेक्स यू कॉल मी??
मोना - वेल.. आय वॉज नॉट हिअर फॉर फिव डेज.. आय केम टू नो दॅट इन्डियन मार्केट इज गोईन्ग टू बी हॅन्डल्ड बाय सम अदर कंपनी अॅन्ड नॉट अवर्स...
डॅनी - वेल... दॅट मॅटर स्टॅन्ड्स क्लोज्ड फॉर अस...
मोना - लाईक... इफ वुई ऑफर अ व्हेरी स्पेशल कमिशन प्रपोजल...
डॅनी - नो मॅन... इट्स बाय गॉन.. लेट्स नॉट स्पेन्ड टाईम ऑन दॅट...
मोना - हे... वेट वेट... आय हॅव वन मोर आयडिया...
डॅनी - सॉरी... आय अॅम कीपिंग द फोन मॅन...
मोना - हे... आय वॉन्ट टू बाय ट्वेन्टी मशीन्स..
ठेवता ठेवता फोन उचलला डॅनीने!
डॅनी - डिड यू से यू वॉन्ट टू बाय मशीन्स???
मोना - अॅबसोल्यूटली...
डॅनी - फॉर व्हॉट???
मोना - आय मीन... आय हॅव अॅप्लिकेशन्स हिअर...
डॅनी - अॅप्लिकेशन्स... व्हॉट अॅप्लिकेशन्स..????
मोना - देअर इज अ ह्यूज रिक्वायरमेन्ट इन अवर एरिया... फॉर सच इक्विपमेन्ट्स...
डॅनी - यू नीड टू रूट सच रिक्वायरमेन्ट्स थ्रू द एजंट... वुई कान्ट हॅव डायरेक्ट सेल...
मोना - फाईन.. फरगेट इट...
जवळपास मोना फोन ठेवणार तेवढ्यात तिला अपेक्षित तेच झाले.
वीस मशीन्स हा आकडा अर्देशीर, हेलिक्स आणि डॅनलाईन या तिघांनीही विचारात घेतलेल्या अॅग्रीमेन्ट ड्राफ्टमधील पहिल्या दिड वर्षाच्या एक्स्पेक्टेड क्वांटिटीपेक्षाही काहीसा अधिक होता. ही मुलगी मूर्ख असणार हे डॅनीचे मत जवळपास ठाम होऊ पाहात होते. पण एक चान्स म्हणून त्याने 'ठेवला जात असलेल्या' फोनमध्ये 'सेल्समन'चा आक्रोश केला.
मोना - ... हेलो.. डिड यू से एनीथिंग??
डॅनी - यॅ..! आय मीन... इफ द क्वान्टिटी इज अॅज बिग अॅज ट्वेन्टी इन वन स्ट्रोक...
मोना - इट कूड बी इव्हन ट्वेन्टी फाईव्ह... डिपेन्डिंग अपॉन टर्म्स..
डॅनी - नो वन बाईज सच क्वान्टिटीज...
मोना - आय हॅव क्लाएन्ट्स... आय कॅन बाय.. इन वन गो...
डॅनी - विच टाईप??
मोना - द वन यूझ्ड फॉर स्टील अॅन्ड सिमेन्ट प्लॅन्ट इन्टर्नल रोड्स...
डॅनी - दॅट्स नॉर्मली डी एन ३२०...
मोना - यॅह... द सेम वन....
डॅनी - ट्वेन्टी....
मोना - ट्वेन्टी....
डॅनी - डिलीव्हरी???
मोना - मॅक्स थ्री मन्थ्स... आय कान्ट वेट....
डॅनी - आर यू...... शुअर अबाऊट ऑल धिस???
मोना - टेल मी द बॅन्कर्स... आय'ल गेट द एल सी ओपन्ड आफ्टर वुई साईन द अॅग्रीमेन्ट...
डॅनी - बट द क्वान्टिटी यू स्पेसिफाईड इन द प्रिव्हियस अॅग्रीमेन्ट वॉज जस्ट टेन मशीन्स अ इयर..
मोना - याह... गॉन अप नाऊ...
डॅनी - वेल... आय'ल आस्क शॅहरुख गाईज टू गेट इन टच विथ यू.....
मोना - हॅव यू ऑलरेडी टाइड अप विथ देम???
डॅनी - आय मीन.. द प्रोसेस विल बी ओव्हर इन अबाऊट अ वीक्स टाईम...
मोना - ओह... देन आय अॅम नॉट इन्टरेस्टेड...
डॅनी - व्हाय????
मोना - दे विल अॅड देअर मार्क अप ऑन दॅट...
डॅनी - ... मार्क अप... ओह...
मोना - ऑर यू आस्क देम टू सप्लाय अॅट मॅन्युफॅक्चर्र्स प्राईस टू अस...
डॅनी - सो इट विल बी अॅन इम्पोर्ट फॉर यू???
मोना - नो... इट विल बी अॅन इम्पोर्ट फॉर देम.. फॉर अस इट विल बी अ डोमेस्टिक पर्चेस...
डॅनी - सी दिज गाईज अॅड हार्डली टू पर्सेन्ट मार्क अप...
मोना - दॅट ट्रान्सलेट्स टू फिव हन्ड्रेड थाऊझंड रुपीज...
डॅनी - एनीवेज यू आर गोईंग टू सेल इट टू अदर्स...
मोना - मे बी ऑर मे नॉट बी... आय माईट यूझ फाईव्ह मशीन्स फॉर मायसेल्फ...
डॅनी - सो इत वूड मॅटर... द मार्क अप...
मोना - इट वूड मॅटर ह्यूजली...
डॅनी - हाऊ अबाऊट अ डायरेक्ट डील??
मोना - आय हॅव बीन टॉकिंग अबाऊट अ डायरेक्ट डील इटसेल्फ...
डॅनी - यूअर इमेल???
मोना - एम ओ एन ए जी यू पी टी ए @ जी यू पी टी ए एच ई एल आय एक्स डॉट कॉम...
डॅनी - आय्'ल जस्ट रीपीट....
मोना - ... फाईन...
डॅनी - एम ओ एन ए जी यू पी टी ए @ जी यू पी टी ए एच ई एल आय एक्स डॉट कॉम
मोना - दॅट्स राईट...
डॅनी - एक्स्पेक्ट अॅन इमेल फ्रॉम मी इन फिव मिनिट्स अॅन्ड करस्पॉन्ड... वुई शॅल क्लोज इट व्हेन???
मोना - बाय द टाईम यूअर ऑफीस क्लोझेस टूडे..
डॅनी - सो... इन अबाऊट एट हवर्स????
मोना - बिफोर दॅट....
डॅनी - .. डन... कीप चेकिंग यूअर मेलबॉक्स... बाय....
मोना - बाय मिस्टर बॅरेट...
संध्याकाळ वाटली तेवढी मुळीच उदास नव्हती. लहान मुलीसारखे धावत सुटावेसे वाटत होते. मूर्ख असतात बिझिनेसमधली सिनियर माणसेसुद्धा!
खरच इमेल आली. पण अर्ध्या तासाने.... स्टॅन्डर्ड ऑफर होती. आणि..... सगळ्यात मोठी गंमत म्हणजे...
.... डिस्क्लेमर असावा तशी एक ओळ हळूच आली होती ऑफरच्या खाली...
'तुम्हाला पाच परसेन्टवर एजन्सीत इन्टरेस्ट असेल तर आम्हालाही असू शकेल..'
म्हणजेच.. अर्धा तास डॅनीने इन्टरनली बोलण्यात घालवला होता आणी ही ओळ त्याचाच परिणाम असण्याची शक्यता होती..
त्याचा कॉलही आला चक्क! मोनाने ऑफर स्टडी करत आहे असे सांगीतले. आणि एक तासाभराने निवांत उत्तर दिले. उत्तर काय द्यायचे ते ठरवलेले होतेच तिने! पण महत्व वाढावे म्हणून एक तासाने दिले!
'आपल्या ऑफरमध्ये आम्हाला आणखीन सहा टक्के डिस्काऊंट मिळावे....'
आणि डॅनीच्याच मेलप्रमाणे खाली एक छोटीशी लाईन लिहीली...
'एजन्सीसाठी आम्ही बारा परसेन्टचे प्रपोजल धाडलेले होते.. पण.. आठ टक्क्यांवर करायला तयार आहोत.. अॅज अ स्पेशल केस...'
बिझिनेसमध्ये कुणाची जास्त 'फाटली' आहे याचा अंदाज येण्यासाठी बरेचदा धीट भूमिका घ्यावी लागते. मोनालिसाने एक नवशिकी मुलगी असूनही ही भूमिका बिनधास्त घेतली होती.
तिलाही तासाभराने उत्तर आले...
'आठ नाही, मात्र साडे सहा टक्क्यांवर चालू शकेल.. मात्र या वीस मशीन्सचे डील पार पडल्यानंतरच ते अॅग्रीमेन्ट साईन होईल...'
तिने तातडीने उत्तर धाडले..
'वीस मशीन्सचे डील लगेच पार पाडू... पण अॅग्रीमेन्ट साईन झाल्यावर या वीस मशीन्सच्या डीललाही त्या टर्म लागू व्हायला हव्यात...'
थोडक्यात आणखीन थोडे डिस्काऊंट मिळाले असते... उत्तर आलेच...
'तसे करता येणार नाही.. हे ट्रॅन्झॅक्शन पार पडण्यावरच ते डील अवलंबून ठेवावे लागेल...'
मोनाने क्षणभरही विचार केला नाही. मात्र! उत्तर चक्क पंचेचाळीस मिनिटांनी दिले.
'ठीक आहे... हे डील व अॅग्रीमेन्ट स्वतंत्रपणे ट्रीट होईल.. मात्र... ते एक्स्क्लुझिव्ह अॅग्रीमेन्ट असेल व भारतात इतर कुणालाही ही एजन्सी मिळणार नाही... किमान पाच वर्षे...'
येतच नव्हते उत्तर! कित्ती कित्ती तरी वेळ!
आठ वाजता निराश झालेली मोना आपल्या बेडरूममध्ये जायला निघाली. आणि....
.... कॉल आला... कॉलवर डॅनी होता... काहीतरी म्हणाला खरे... मेल पाठवली आहे.. बघून लगेच कळवा... उशीर करू नका वगैरे वगैरे...!
जिन्यावरून लहान मुलीसारखी पळत आली मोना आणि पुन्हा चेक केले..
अच्छा अच्छा! डॅनीच्या वरच्या माणसाने पाठवली होती मेल... त्यामुळेच समजत नव्हते... आपल्याला तो कुठलातरी फेक आय डी वाटत होता... बावळटाने सब्जेक्टही चेंज केला होता... काय तर म्हणे ... 'हॅन्डशेक'.. असा कधी सब्जेक्ट असतो इतक्या महत्वाच्या इमेलचा???
'वुई आर प्लीझ्ड टू ...."
वगैरे वगैरे!
उद्या आणखीन एक बातमी जतीन आणि सुबोधच्याही बातम्यांपेक्षा वेगात फिरणार होती हेलिक्समध्ये...
'डॅनलाईन'स इन्डियन ऑपरेशन्स हॅव कम टू हेलिक्स'
अत्यानंदात बावळटासारखी गिरकीच घेतली तिने!
गेम काय टाकली होती ते तिचे तिलाच माहीत होते. डॅनलाईनच्या वीस मशीन्सची किंमत अडीच कोटींपर्यंत जाणार होती. ही मशीन्स विकत घेऊन ती आजवर तिने जमवलेल्या एन्क्वायरीजना खूप डिस्काऊंट देऊन विकणार होती. यात तिला किमानपक्षी तीस लाखाचा घाटा झाला असता. पण या तुटक्या दगडामुळे अनेक पक्षी मरायला येणार होते. एक म्हणजे डॅनलाईनला हा परफॉर्मन्स अर्देशीर कधीच दाखवू शकले नसते कारण मोनापेक्षा ते आर्थिक दुर्बळ घटकात मोडत होते! दुसरे म्हणजे जतीन आणि सुबोधपेक्षा मोना कर्तृत्ववान आहे हे लोहियांना झक मारत मान्य करावे लागणार होते. डॅनलाईन तिच्यामागे एजन्सीसाठी लागणार'च' होते. अर्देशीरांना एजन्सी मिळाली तरीही मोनाच्या किंमतीत मशीन्स ते विकू शकणार नव्हते. कारण 'स्टील ऑथोरिटी' आणि सिमेन्ट प्लॅन्ट्स हे तसे फारच छोटे जग होते. राऊरकेलाला वीस लाखात गेल्या सहा महिन्यात मिळालेले मशीन्स आम्हालाच पंचवीस लाखाला कसे हे विशाखापट्टणम स्टील प्लॅन्ट विचारणारच होता. हेलिक्समध्ये मोना अत्यंत महत्वाची ठरणार होती. भल्याभल्यांना पाणी पाजणारी मुलगी अशी तिची ख्याती होणार होती.
आणि हे सगळे... केवळ गेम टाकून.. एक साधीसुधी गेम टाकून...
बिझिनेसचे एक तत्व असते... खिशातला पैसा ओतून कधीही काहीही करायचे नाही.. पण या बावळट मुलीने ते केलेले होते...
... मी मरेन पण तुला विधवा करीन अशी स्ट्रॅटेजी तिने अर्देशीरांच्या बाबतीत घेतली होती.. मात्र... हे धोरण, ही कल्पना.. प्लॅटिनमसारखी निघाली होती... साडे सहा टक्यांवर डॅनलाईन एजन्सी हे गिरकी घेण्यासारखेच होते...
आणि सायरा बघतच बसली.
मोना - हे काय??? तू अजून इथेच???
सायरा - .....??????
मोना - ब्ल्यू डायमंडला नाही गेलीस????
सायरा - ...मी?????? ... काय बोलताय मॅम????
मोना - बावळट बाई.. जा आवर लवकर... मस्त आवरून जा..
सायरा - ... यू... आर यू....
मोना - आय अॅम अॅबसोल्यूटली शुअर सायरा.... आणि त्यांना सांग... मॅडम आज खूप रडत होत्या...
सायराने अविश्वासाने मान डोलावली.
मोना - सायरा.. आय... आय अॅम सॉरी.. पण.. तुला असे नाही ना वाटत की मी तुला.. यूझ...
सायरा - छे छे... मी या असल्या नालायक...
लोहिया आणि कंपनीला 'आपण' मॅडमसमोर 'नालायक' म्हणणे योग्य नाही हे लक्षात येताच सायरा चपापली...पण मोना अगदी निर्मळ हासली...
मोना - आणि... डोन्ट फर्गेट टू टेल हिम.. दॅट .. यू आर प्रेग्नंट...
सायराला आत्ता खरी गेम समजली.
अर्ध्याच तासाने सायरा परवानगी मागून बंगल्याच्या बाहेर पडत असताना मोना तिची पाठ वळत असतानाच म्हणाली...
"बोलणे... टेप कर हं सायरा??? छोटा रेकॉर्डर आहे आपल्याकडे.. तो पर्समध्ये ठेव..."
दारात पाठमोरी असलेल्या सायराला ..... अक्षरशः घाम फुटला होता... आणि... तिचे ते थबकणे...
... मोनालिसा गुप्ता... अपेक्षितच असल्याप्रमाणे पाहात होत्या...
मी पहिला.
मी पहिला.
आला १दाचा भाग आता वाचते.
आला १दाचा भाग आता वाचते.
सुरुवात करतो वाचायला आता.
सुरुवात करतो वाचायला आता.
मी आज चौथा! आता
मी आज चौथा! आता वाचतो!..धन्यवाद बेफिकीर!
मी रुमाल नाही टाकला...पुर्ण
मी रुमाल नाही टाकला...पुर्ण वाचून प्रतिक्रीया देतोय...
फारच तुफानी भाग....
तडकाफडकी सुबोध आणि जतीनची हकालपट्टी आणि पाठोपाठ तोटा सोसून डॅनलाईनची एजन्सी....
वाचताना एकदम मस्त वाटतय..पण याचेही लॉंग टर्म इफेक्ट्स असतील...
जाणवतयं ही लढाई एवढ्यात संपणार नाही...किंबहुना आता खरी लढाई सुरू झालीये...
कार्पोरेट वॉर....तुफान शब्दबद्ध केलेय तुम्ही....
दारात पाठमोरी असलेल्या
दारात पाठमोरी असलेल्या सायराला ..... अक्षरशः घाम फुटला होता... आणि... तिचे ते थबकणे...
... मोनालिसा गुप्ता... अपेक्षितच असल्याप्रमाणे पाहात होत्या... >>>>>>>>>>>
ट्रिपल क्रॉस ??
मस्त चालू आहे ...
लगेच वाचुन झाला!!..सुपर फास्ट
लगेच वाचुन झाला!!..सुपर फास्ट स्पीड होती आजच्या एपिसोड ची!...अप्रतिम! आता पुढच्या भागाची वाट पाहातोय!
मस्तच आहे.
मस्तच आहे.
सस्पेन्स चागंला गोवलाय.....
सस्पेन्स चागंला गोवलाय..... पुढच्या भागाची उत्सुकता अजुन वाढली आहे आता.....
Shit yaar.....मला उगाच वाटल
Shit yaar.....मला उगाच वाटल मी पहिली म्हणून....
समोर शून्य लागलाच .... असू देत ....आता आरामात वाचते ..... प्रतिसाद देण्याचा प्रश्नच नै कारण कथा नेहमीप्रमाणे चांगलीच असणार .... बाकी तेवढा क्रमशः आडवा येतो ...
तुफान स्पीड.... जबरदस्त
तुफान स्पीड.... जबरदस्त थ्रील... मोनाच्या शब्दांना तलवारीची धार आहे...कसली बोलते जबरी!!!
एवढ्या सिरियस कथानकात मधून मधून जोरजोरात हसू आले... हे काही निवडक संवाद :
_________________________________________________________________________
जतीन - मोनालिसा... वुई आर कझिन्स...
मोना - होय... सो आय विल कीप टायिंग राखी अॅन्ड टेकिंग स्वीट्स फ्रॉम यू बट वुई कान्ट वर्क टुगेदर...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
जतीन - बेसिकली अर्देशीर हुषार आहेत..
मोना - मग तू काय आहेस????
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
लोहिया - यू.. मेड अ मिस्टेक.. दे वेअर ओल्ड लेफ्टनंट्स ऑफ हेलिक्स...
मोना - सिनिऑरिटी इज नॉट अॅज इम्पॉर्टन्ट अॅज परफॉर्मन्स अंकल...
_________________________________________________________________________
खुप मज्जा आली हा भाग वाचतांना
सही !! आजचा भाग तुफान होता.
सही !! आजचा भाग तुफान होता.
सिम्प्ली gr8 पण एकच प्रश्ण
सिम्प्ली gr8
पण एकच प्रश्ण आहे की भारतात १० मशिन्सच मार्केट आहे तर अजुन १० मशिन्सचे काय हा तिला ३० लाखापेक्षा मोठा problem होऊ शकतो?
अर्थात पुढे कळेलच कार्ण मोनानेही काही प्लॅन केले असेलच, सहज मनात आले.
मजा आली.
मी जेव्हा डॅनलाईनसाठी मार्केट
मी जेव्हा डॅनलाईनसाठी मार्केट शोधत होतो तेव्हा, म्हणजे १९९१ सालीच भारतात दर वर्षी ६४ मशीन्सचे मार्केट होते. कथेत तो आकडा मी मुद्दाम कमी घेतला आहे. (अर्थात, डॅनलाईन ही कंपनी स्पेनची मात्र नव्हे. यू.के. ची आहे.)
विशाखापट्टणम स्टील प्लॅन्टची ऑर्डरही मला मिळाली होती पण दरम्यान मी नोकरी सोडली व दुसरीकडे जॉईन झालो.
कथेत तो आकडा 'मुद्दाम' कमी घेण्याचे कारण इतकेच आहे की डॅनलाईनची क्लीनिंग मशीन्स तितकीशी 'भारताळलेली' नव्हती व आजही नाहीत. मात्र त्या मशीन्सची व्हॅल्यू खूपच असायची!
सर्वांचे मनःपुर्वक आभार या इतक्या रुक्ष कथेलाही प्रेमाने सपोर्ट करण्याबद्दल!
-'बेफिकीर'!
हम्म, बेफिकीरजी तुम्ही या
हम्म, बेफिकीरजी तुम्ही या क्षेत्रात चांगलेच मुरलेले असणार असा अंदाज होताच.
वाह..तुम्ही म्हणजे एकदम एक्टीव्ह प्लेअर होता वाटतं
सानी...मोदकांचे ताट...
मलाही ही वाक्ये फार म्हणजे फार आवडली...
मी जेव्हा डॅनलाईनसाठी मार्केट
मी जेव्हा डॅनलाईनसाठी मार्केट शोधत होतो तेव्हा, म्हणजे १९९१ सालीच भारतात दर वर्षी ६४ मशीन्सचे मार्केट होते. कथेत तो आकडा मी मुद्दाम कमी घेतला आहे. (अर्थात, डॅनलाईन ही कंपनी स्पेनची मात्र नव्हे. यू.के. ची आहे.)
विशाखापट्टणम स्टील प्लॅन्टची ऑर्डरही मला मिळाली होती पण दरम्यान मी नोकरी सोडली व दुसरीकडे जॉईन झालो.
>> थॅन्क्स! मार्केटिन्ग भारतात इन्ट्रस्टिन्ग आहे ही बाजु मल कधी एक्स्पोझ झाली नव्हती.
रूक्ष....अहो यापेक्षा
रूक्ष....अहो यापेक्षा इंटरेस्ट्रींग काय असेल...
प्रत्येक टप्प्याला उत्सुकता वाढत चालली आहे
धन्स आशु... ही मोनाबेटी
धन्स आशु...
ही मोनाबेटी माझ्या मनात इतकी सातत्याने डोकावत असते, की मला अजिबात तटस्थपणे वाचू देत नाही... त्यामुळे रुक्ष वाटण्याचा प्रश्नच गैरलागू आहे....

शिवाय कॉर्पोरेट वर्ल्ड रुक्ष असेल हा मनातला समजही ह्या कादंबरीमुळे दूर झाला... त्यातले खाचखळगे, राजकरण, उच्चपदावरील लोकांचे आपापसातले संबंध, ताणतणाव अशा अनेक पैलूंची ओळख होते आहे... कादंबरी खुपच आवडते आहे.
तुम्ही इंग्लिश वाक्ये सरळ
तुम्ही इंग्लिश वाक्ये सरळ इंग्रजी लिपीत का लिहीत नाही.. इट्स इझी टु रीड->its easy to read.
भन्नाट! अब्बास्-मस्तान कडे
भन्नाट! अब्बास्-मस्तान कडे पाठवायची का हि कथा?
बेफिकीर,
अहो चिंगींच्या सूचनेचा खरोकर विचार करा ना!
बेफिकीर.. एकदम मस्त चालु आहे
बेफिकीर.. एकदम मस्त चालु आहे कथानक..
ईकडे पब्लि़क भांडत नाहीये पाहुन चांगले वाटले..
पुढील भागाच्या प्रतिक्षेत ..
नेहमीसारखीच सुंदर. उत्सुकता
नेहमीसारखीच सुंदर. उत्सुकता वाढली आहे फारच...
मला शेवटची ओळ कळली नाही ,
मला शेवटची ओळ कळली नाही
, बाकी कथा मस्त
कथेला स्पिड चांगला आहे,...
बेफिकिरजी ८,९,१० सर्व आजच
बेफिकिरजी ८,९,१० सर्व आजच वाचले. खुपच छान.
धन्यवाद.
कथा मस्त चालु आहे.
कथा मस्त चालु आहे.
रुक्ष नाही आहे .. बेफिकरजी
रुक्ष नाही आहे .. बेफिकरजी अप्रतीम.... वरील सर्वांना अनुमोदन
बेफिकीर जी कथा नेहमीप्रमाणेच
बेफिकीर जी
कथा नेहमीप्रमाणेच अप्रतिम आणि त्यामुळेच कथेत गुतंत चालले आहे...
तुमची स्पीड अन् लेखन तर लाजवाब.....
पु.ले.शु.
शिवाय कॉर्पोरेट वर्ल्ड रुक्ष
शिवाय कॉर्पोरेट वर्ल्ड रुक्ष असेल हा मनातला समजही ह्या कादंबरीमुळे दूर झाला... त्यातले खाचखळगे, राजकरण, उच्चपदावरील लोकांचे आपापसातले संबंध, ताणतणाव अशा अनेक पैलूंची ओळख होते आहे... >> अनुमोदन सानी
अरे वा.. बेफिकिर... मस्त
अरे वा.. बेफिकिर... मस्त वाटला आजचा भाग
ह्या कादंबरीचे पहिले काही भाग वाचल्यावर मनात आलेले तुम्हाला विचारावे, या फिल्डमधला तुम्हाला काही अनुभव आहे का वगैरे... कारण तुम्ही या विषयाची मांडणी अगदी छान मुद्देसुद केलेली आहे....
पण तुमच्या या भागातल्या प्रतिसादात मला उत्तर मिळाले...

पु.ले.शु.
Pages