वास्तुशास्त्रा बद्द्ल माहिति ह्वी आहे. कोणी कोर्स केला अस्ल्यास मार्गदर्शन करावे. करिअर म्हणुन काय संधी आहेत ?
वास्तुशास्त्रा बद्द्ल माहिति ह्वी आहे. कोणी कोर्स केला अस्ल्यास मार्गदर्शन करावे. करिअर म्हणुन काय संधी आहेत ?
वास्तुशास्त्रा बद्द्ल माहिति ह्वी आहे. कोणी कोर्स केला अस्ल्यास मार्गदर्शन करावे. करिअर म्हणुन काय संधी आहेत ?
कंटाळा आला की हा खेळायचा
नवीन लेखनावर जायचे
पहिले तीन बाफ निवडायचे - शिर्षक, लेखकार, व शेवटचे तीन टीकाकार अशा ५ गोष्टी गुंफुन वाक्य बनवुन पाडायचे.
ती तिथेच लिहावे असे आधी वाटत होते पण आपला खेळ तो लोकांचा खंडोबा व्हायचा (म्हणजे देवावर बेतल्यासारखे म्हणुन लोक बोंबलायचे)
म्हणुन मग इथे लिहायचे ठरविले
सब-खेळः वाक्य थोडे क्रिप्टीक केले तर कशाबद्दल बोलतो आहोत हे पण आळखायला मजा येईल.
डार्क ऑरेंज शुभ्र सफेद वर जरा उग्रच वाटतो
मात्र तोच लाईट क्रिम वर डोळे थंड करतो
पहा बँकग्राऊंड बदलल्याने किती तो फरक पडतो
मी काहिसं असंच बँकग्राऊंड बदलायचं ठरवलयं,
तुमच्यात राहावसच वाटत नाही
भटक्यांमध्ये जावसं वाटतय
बँकग्राऊंड बदलून उठून दिसेल कदाचित,
मी काहिसं असंच ठरवलयं,
पिवळ्यात जरासं निळ मिसळलं तर हिरवं होतं
हे भकास पिवळं गवत त्या निळ्या आकाशाच्या
बँकग्राऊंडवर किती उसळलं तरी हिरव काहि होईना
इतक्यात कोणी पेटवल कि ते काळं होऊ पाहतय
जख्खं काळं म्हणजे कोणत्याच रंगाचा आता मागमूस नाही
असं कसं काळा हा काही मूळ रंग नाही
सगळे रंग कुस्करून टाकावेत
तेव्हा कुठे हा अंधार बनतो
मनात भाव
ओठांवर शब्द
गीत फूलण्या नवे
काय हवे आणि
सुखाचे व्हावे कारण
दु:खाचा घ्यावा हिस्सा
धीराने जगण्या
काय हवे आणि
हातास हात
असावी एक साथ
पुढे जाण्यासाठी
काय हवे आणि
दिव्यात तेल
कापसाची वात
मिटवण्यास अंधार
काय हवे आणि
कुणा चोचीत दाणा
कुणा चोचीत पाणी
जगण्यासाठी
काय हवे आणि
- देवनिनाद
१
ठसे वाटेत बैलांच्या खुराचे
दिसे डबक्यातले पाणी चहाचे
उठे पाण्यावरी गोरे तरंग
कुणाचे घासले पाण्यास अंग
२
हवेचा येइ हिरवागार झोका
झुले त्याच्यासवे डोंगरही अख्खा
कसे हे साठवू सौंदर्य डोळी
बहरल्या डोंगरावर रानकेळी
३
धुक्याचा सारला परदा हवेने
उभे डोळ्यात हिरवेगार लेणे
कळेना काय डोळ्यांनी टिपावे
कळेना ओठ कोठे टेकवावे
४
निळा अंधार होता दाटलेला
पिकांचा वास ओल्याशा हवेला
कमी ना भासली कुठल्या दिव्याची
अशी झगमग बघितली काजव्यांची...
- वैभव देशमुख